स्वातंत्र्यदिनी सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान…

0

 नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल व बेघर आश्रय निवाराचे संचालक अतुल पालांडे सन्मानित.

हिंगणघाट -/ स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित समारंभात नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटचे अध्यक्ष महेश अग्रवाल आणि बेघर आश्रय निवाराचे संचालक अतुल पालांडे यांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.रत्न विद्यानिकेतन आणि बन्सीलाल कटारिया शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांच्या अथक परिश्रमाची आणि समाजिक कार्याची दखल घेऊन शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित केले.आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भागचंद ओस्तवाल होते तर उपाध्यक्ष विनय लोढा, सचिव हेमंतकुमार ओस्तवाल, कोषाध्यक्ष राजेंद्र सिंघवी, सदस्य राजेश कोचर, डॉ.लोकेश ललवाणी, हेमंत चोरडिया,महेंद्र कासवा, प्राचार्य अजयकुमार यादव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. अध्यकक्षीय भाषणात ओस्तवाल म्हणाले की समाजसेवी अग्रवाल व पालांडे या दोन्हीही व्यक्तींचे समाजसेवेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याने अनेकांच्या जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पडला आहे आणि आम्हाला आशा आहे की ही ओळख इतरांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास प्रेरित करेल. प्रास्ताविकासह संचालन तनुश्री बांगडे व भूमिका वैद्य या विद्यार्थिनींनी केले. उपस्थितांचे आभार प्राचार्य यादव यांनी मानले.

ईकबाल पहेलवान साहसिक news-24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!