हरियाली अमावस्येनिमित्त श्रीरासबिहारी गोशाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…….

0

 🔥हरियाली अमावस्येनिमित्त श्रीरासबिहारी गोशाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

वर्धा -/ श्री रासबिहारी जनकल्याण सेवा ट्रस्टच्या अंतर्गत संचालित श्रीरासबिहारी गोशाळा, नागठाणा (वर्धा) येथे हरियाली अमावस्येच्या पावन पर्वानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

     गोशाळा परिसर अधिक हिरवागार, नैसर्गिक व पर्यावरणपूरक बनविण्यासोबतच गोमातेला स्वच्छ, हिरवाईने नटलेले व पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना श्रीहरी महाराज यांनी सांगितले की, भविष्यात गोवंशाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी श्रीरासबिहारी गोशाळेत व्यापक व आदर्श प्रकल्प उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षारोपण हे केवळ पर्यावरण संवर्धनाचे कार्य नसून गोसेवेचेही एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुभाष राठी यांनी गोसंरक्षण व गोशाळेच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत या पवित्र कार्यात सर्वतोपरी योगदान देण्याची भावना व्यक्त केली. 

      कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सुभाष राठी (विहिप जिल्हाध्यक्ष), विहिप स्वाबलंबी भारत विदर्भ प्रांत प्रमुख अटल पांडे,विहिप वर्धा जिल्हा मंत्री शरद कोनप्रतिवार,बजरंग दल वर्धा जिल्हा संयोजक महेश राउत, अमोल अतकर, किरण उपाध्ये, निखिल मसराम, प्रशांत आकरे, महेंद्र आकरे, अंबुज पांडे, प्रशांत यादव, पारस साहू, उत्कर्ष साहू, सुनैना साहू, मुन्ना साहू, रामेश्वरी यादव, विपिन यादव, विवेक यादव, अशोक साहू, कुंदनलाल जैस्वाल, कनिष्क साहू, स्नेहलता चुडीवाले, कुसुम गुप्ता, अशोक कुमार, रेखा आकरे, दुर्गा सातपुते, ज्योती रघाटाटे, विशाल मनेश्वर, खुशाल आकरे व करण रघाटाटे तसेच पंडित शैलेन्द्र दीक्षित (मुख्य व्यवस्थापक, श्रीरासबिहारी गोशाळा) यांच्यासह अनेक गोसेवक व समाजसेवक उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने महिला गोसेविकांनी उपस्थित राहून वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला. शेवटी उपस्थित सर्वांनी गोसंरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि हरित वर्धा यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला.

           ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!