हिंगणघाट – / दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या पथकाने १० एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईत विदेशी व देशी दारूसह एकूण २२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप.क्र. 506/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(e), 77(a), 83 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 130/177 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार अनिल शिवराम राऊत (वय 46) यांनी तक्रार नोंदवली आहे.
ही कारवाई मौजा संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट येथे दि. १० एप्रिल २०२६ रोजी पहाटे १.०० ते २.२० वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. पोलीसांनी संशयित पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ (MH-05-CV-6331) वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये –
ROYAL STAG कंपनीची विदेशी दारू – २ लिटरचे ४८ बंपर (८ खोक्यांमध्ये) किंमत अंदाजे ₹1,44,000
रॉकेट कंपनीची देशी संत्रा दारू (90 ml) – ६,५०० नग (६५ खोक्यांमध्ये) किंमत अंदाजे ₹6,50,000
महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन – किंमत अंदाजे ₹15,00,000
असा एकूण ₹22,94,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्कॉर्पिओ वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सपोनी दीपक वानखेडे, पो.उपनि. महेश इटकल तसेच पोलीस कर्मचारी अनिल केकतपुरे, दिलीप पवार, प्रवीण बोधाने, कृष्णा माने, प्रमोद दडमल, सागर समृतवार व मंगेश वाघमारे यांनी सहभाग घेतला.
पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.