हिंगणघाट -/ आ.कुणावार यांची गेल्या १० वर्षांपासून हिंगणघाट येथे ग्रामीण विभागासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मितीची मागणी असून लवकरच पुर्ण करण्यात येईल पुढील १ आठवड्यात यासंबंधात मुख्यमंत्र्याच्या परवानगीने मंजूर करण्याचे प्रयत्न करण्यात येईल,असे आश्वासन गृहराज्यमंत्री ना. पंकज भोयर यांनी आज हिंगणघाट येथील नागरिकांना दिले.आज २३ रोजी पोलिस विभागाअंतर्गत हिंगणघाट येथील पोलिस ठाणे हिंगणघाट तसेच उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या नवीन प्रशासकीय इमारतीकरीता आयोजीत भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर आ. समिर कुणावार, नगराध्यक्ष डॉ नयना तुळसकर, जिल्हाधिकारी वनमथी सी, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अँड सुधीर कोठारी, किशोर दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आ.कुणावार यांनी सरकारने ६ कोटी,२० लाख रुपये निधी देण्यात आला असून लवकरच शहरातील पोलिस ठाण्याची व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची अद्यावत अशी वास्तू लवकरच उभी राहणार असून यासाठी त्यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री ना. पंकज भोयर तसेच महाराष्ट्र सरकारचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी गृहराज्यमंत्री(ग्रामीण)ना. भोयर यांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने मुंबई येथे पोलिसांकरिता २० हजार घरांकरिता मंजुरी देण्यात आल्याची माहिती देत हे सरकार कृतिशील असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्षा डॉ नयना तुळसकर यांनी विचार व्यक्त करतांना नव्याने निर्माण होणाऱ्या अद्यावत इमारतीत महिला कर्मचाऱ्यांकरिता सोयी सुविधा निर्माण करण्याची मागणी केली.
सर्व उपस्थीत मान्यवरांचे ठाणेदार अनिल राऊत यांनी आभार व्यक्त करीत कार्यक्रमाचा समारोप केला.
कार्यक्रमाचे संचालन स्मिता महाजन यांनी केले.
यावेळी विभागातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर नागरिक, पत्रकार उपस्थित होते.