🔥हिंगणघाट येथे गुढी पाडव्या निमित्य भव्य बाईक रॅलीचे आयोजन.
हिंगणघाट -/ येथे सकल हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आलेली हिंदू नववर्षाची भव्य बाईक रॅली मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. दिनांक 19 मार्च 2026, गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता संघ कार्यालय, संत तुकडोजी महाराज पुतळा येथून या रॅलीची सुरुवात करण्यात आली.
या भव्य रॅलीमध्ये सुमारे 1000 पेक्षा अधिक बाईकस्वारांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. संपूर्ण शहर “जय श्रीराम” आणि “हर हर महादेव”च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. भगवा ध्वज फडकावत हिंदू समाजाने एकता, धर्माभिमान आणि संस्कृतीचे भव्य दर्शन घडविले.
रॅलीतील आकर्षणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंजाबी ढोलचा दमदार नाद, घोड्यावरती भगवा ध्वज,जोशपूर्ण डीजे संगीत, सुंदर सजवलेली बग्गी तसेच श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या वेशभूषेत लहान चिमुकल्यांची मनमोहक झलक यामुळे रॅलीला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक रंग प्राप्त झाला. मातृशक्तीचा मोठ्या प्रमाणात सहभाग हा या रॅलीचा आणखी एक विशेष ठरला.
या कार्यक्रमाला वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघ चालक विनोद नांदुरकर, सौं. श्रद्धा कुणावार, नगराध्यक्षा सौ. नयना उमेश तुळसकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शिवव्याख्याते राजा महाराज शेंडे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, नगर उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, उमेश तुळसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या रॅलीला नगराध्यक्षा नयना तुळसकर आणि श्रद्धा कुणावार यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.संपूर्ण रॅली अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि शांततेत पार पडली. या रॅलीच्या यशस्वीतेकरिता विश्व हिंदु परिषद जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार,वर्धा जिल्हा बजरंग दल सुरक्षा प्रमुख प्रशांत तिवारी, जिल्हा सह गौरक्षा प्रमुख राम नक्के,हिंगणघाट प्रखंड मंत्री देवा वाघमारे, हिंगणघाट बजरंग दल संयोजक दीपक शर्मा, संदीप मोटवानी, विद्या पेंडके, सविता धारकर यांनी मेहनत घेतली आयोजकातर्फे सर्व सहभागी बांधव, भगिनी, तरुण-तरुणी तसेच मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या रॅलीमुळे हिंगणघाट शहरात हिंदू नववर्षाचे स्वागत एकतेच्या, अभिमानाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात मोठ्या थाटामाटात करण्यात आले या वेळेस तगडा बंदोबस्त पोलीस प्रशासनातर्फे ठेवण्यात आला होता.