🔥हेच ते हिंगणघाट शहा-लंगडी परिसरात प्लॉट बुकिंगचा फसवणुकीचा संशय; ग्राहकांनी सावध राहण्याचे आव्हाण !
हिंगणघाट -/ तालुक्यातील शहा-लंगडी परिसरात मौजा जुनोना ओम साई नगरी (सर्वे नं. 19/1अ/1, क्षेत्रफळ 1.62 आर) या शेतजमिनीवर प्लॉट बुकिंग सुरू असल्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत. अवघ्या ११ हजार रुपयांत बुकिंग व १५ महिन्यांत हप्त्यांची सोय असल्याचे आमिष दाखवून अनेक ग्राहकांकडून गुंतवणूक घेतली जात आहे.
मात्र, प्रत्यक्ष पाहणी व चौकशीत संबंधित जमीन अद्याप अकृषक (एनए) नसल्याचे तसेच नगररचना विभागाची आवश्यक ले-आउट मान्यता घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. नियम व कायदेशीर परवानग्यांशिवाय प्लॉट विक्री केली जात असल्याचा संशय असून, ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्लॉट खरेदीनंतर रस्ते, नाल्या, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव राहिल्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडे तक्रार केली तरी कायदेशीर परवानग्या नसल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी नागरिकांनी कोणताही प्लॉट खरेदी करण्यापूर्वी संबंधित जमिनीची अकृषक परवानगी, ले-आउटची नगररचनाकार मान्यता, तसेच सर्व शासकीय कागदपत्रांची खातरजमा करूनच व्यवहार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित प्रशासनानेही या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (क्रमशः)