हिंगणा वनविभागावर RTI मध्ये गंभीर आरोप! “शुल्क घेतलं नाही. माहिती रोखली.!”

0

🔥हिंगणा वनविभागावर RTI मध्ये गंभीर आरोप! “शुल्क घेतलं नाही. माहिती रोखली.!”

हिंगणा -/ तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन आणि बोनस वितरणासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी नागरिक गजानन वामनराव ढाकुलकर यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्रथम अपील अर्ज ईमेलद्वारे सादर केला आहे. या अपीलमध्ये त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी, हिंगणा कार्यालयातील जन माहिती अधिकारी (PIO) यांनी जाणीवपूर्वक विलंब केला, तसेच शुल्क मागणी पत्र उशिरा पाठवून प्रत्यक्ष शुल्क भरण्यास गेले असता “PIO उपस्थित नाही, सही लागते” असे सांगून शुल्क स्वीकारण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप केला आहे.अपीलकर्त्याच्या म्हणण्यानुसार, RTI अर्ज दिनांक १९/१२/२०२५ रोजी सादर करण्यात आला होता. मात्र शुल्क मागणी पत्र दिनांक ०६/०१/२०२६ असून ते प्रत्यक्षात १०/०१/२०२६ रोजी प्राप्त झाल्याने प्रक्रियेत अनावश्यक दिरंगाई झाली आहे. तेंदूपत्ता संकलन, बोनस वितरण, तारीखनिहाय नोंदी, रजिस्टर, मुदतवाढ आदेश, चौकशी अहवाल अशा मोठ्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती मागविण्यात आली असून माहिती देण्यास होत असलेली टाळाटाळ ही माहिती लपविण्याचा प्रकार असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणात अपीलकर्त्याने प्रथम अपिलीय अधिकारी मा. श्री. वाय. एस. काळे (सहायक तेंदु व कॅम्पा), नागपूर वन विभाग यांच्याकडे मोफत माहिती देण्याचे आदेश, मागितलेल्या माहितीच्या प्रमाणित प्रती देणे बंधनकारक करणे, तसेच संबंधित PIO विरुद्ध शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची शिफारस, आणि संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही माहिती सार्वजनिक हिताची असल्याने ती ठराविक कालमर्यादेत (उदा. सात दिवसांत) देण्यात यावी, अशीही ठाम मागणी अपीलमध्ये करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!