🔥हिंगणा-वांनाडोंगरीत नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या बगळ्याला मिळाले नवे जीवन!
हिंगणा -/हिंगणा-वांनाडोंगरी येथील गणेश कॉलनी परिसरात भाग्यश्री बोहरे या घरातील काम करत असताना अचानक बाहेरून आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता घराबाहेरील वेलवर एक बगळा (Cattle Egret Bird) अडकलेला दिसला. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी वेळ न दवडता विदर्भ सर्प मित्र समितीचे सदस्य आकाश मेश्राम यांना तात्काळ संपर्क केला.
काहीच वेळात घटनास्थळी पोहोचून आकाश मेश्राम यांनी पाहणी केली असता बगळा नायलॉन मांजामध्ये अडकून गंभीर अवस्थेत फसलेला होता. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक बगळ्याला मांजामधून सुटका करून पूर्ण तपासणी केली आणि त्यानंतर त्या पक्ष्याला निसर्गात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. या कार्याबद्दल बोहरे परिवाराने आकाश मेश्राम यांचे मनापासून आभार मानले.
🔥नायलॉन मांजा बंद करा!
नायलॉन मांजा मजेदार नाही — तो प्राणघातक आहे.
दरवर्षी नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी होतात, तसेच पक्षी मरतात, प्राणी आणि लहान मुलांनाही धोका निर्माण होतो.
कृपया नायलॉन मांजा वापरू नका.
केवळ सुरक्षित सुती धागा वापरा.
जागरूकता जीव वाचवते !
हिंगणा MIDC मध्ये अडकलेला पक्षी दिसल्यास संपर्क करा
मोनू सिंग : +91 94221 20248
अमित वंजारी : +91 96651 75882
आकाश मेश्राम : 7378855719