वर्धा -/विदर्भातील बेरोजगारी, शेतीच्या समस्या, मागासले पणा दूर करायचा असेल, तर स्वतंत्र विदर्भ निर्माण करणे हाच एकमेव उपाय आहे. या विचाराचे प्रसार व प्रबोधन, व पुढील आंदोलनाची आखणी साठी “विदर्भ राज्याचे अधिवेशन” दि २३, २४ मार्च २०२५ ला “आमदार निवास नागपूर”येथे आयोजित केले आहे, या अधिवेशनात मोठ्या संख्येने युवकांनी, शेतकऱ्यांनी, महिलांनी, उद्योजक, व्यापारी व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विराआं समितीचे मुख्य संयोजक माजी आमदार ऍड वामनराव चटप यांनी दिनांक २० मार्च ला विदर्भ राज्य आंदोलन समितीची कार्यकर्ता बैठक व पत्रकार परिषदेत विश्रामगृह वर्धा येथे केले.विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे आश्वासन भाजप नी दिले, दिल्ली, मुंबईत सत्ता असूनही सरकार गप्प आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करण्याचे, बेरोजगारांना प्रती वर्ष २ करोड नोकरी देण्याचे आश्वासन दिले, निवडून आले, परंतु सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही, जिएसटी व इतर करा मध्ये वाढ करून महागाई वाढत आहे. विदेशातून कडधान्य, सुत, दाळी, कच्चे खाद्यतेल याची मुक्त आयात करून देशातील शेतमालाचे भाव पाडले आहे. त्याचा विरोध करण्यासाठी व स्वतंत्र विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावे, यासाठी सर्वांनी विदर्भ अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती सर्व वक्त्यांनी केले.बैठकीला शेतकरी संघटने च्या नेत्या माजी आ.सरोज काशीकर,महिला आघाडी च्या माजी अध्यक्षा शैलाताई देशपांडे, विराआं समितीच्या महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई मामरडे, जय विदर्भ पार्टी चे अध्यक्ष अरून केदार, कोअर कमेटी सदस्य, प्राचार्य पी एम राजपूत, सुनील चोखारे यांनी संबोधित केले.बैठकीचे संचालन जिल्हा समन्वयक मधुसूदन हरणे यांनी तर प्रस्तावना सतीश दाणी यांनी तर आभारप्रदर्शन वर्धा जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा अध्यश्य उल्हास कोंटबकर यांनी केले.बैठकीला विराआं समीती महिलां आघाडी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी लिचडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, महिला आघाडी प्रमुख निर्मला करनाके, प्रभाकरराव झाडे, पंकज साबळे, धोंडबाजी गावंडे, सुनील हिवसे, डॉ अनिल पोफळे, अभिजित लाखे, प्रा. सौदागर, प्रा. टेकाडे, गोविंदराव उमाटे, पुंडलिक हुडे, खुशालराव हिवरकर, गोविंदराव पेटकर, विशाल फाळके, शंकरराव लेवाडे याचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वांनी शेकडोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचा संकल्प केला.