अंतुर्लीत वीजेचा लपंडाव थांबवा- अंतुर्ली शहर काँग्रेस कमिटीची मागणी

मुक्ताईनगर / पंकज तायडे :
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरली येथे बऱ्याच दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे नागरिक त्रस्त झाले आहे या अनुषंगाने अंतुरली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने साहाय्यक अभियंता सचिन आठवले यांच्या माध्यमातून असिस्टंट इंजिनियर व कार्यकारी अभियंता मुक्ताईनगर यांच्या नावे निवेदन देण्यात आले वृत्त विशेष असे कि अंतुरली बस स्टँड पासून बजरंग चौकापर्यंत च्या इलेक्ट्रिक पोल वरील तारा नेहमी तुटत असतात ,स्पार्किंग होत असते वेळोवेळी गावातील या कारणामुळे लाईन जात असते आपण खबरदारी घेऊन या ठिकाणावरील विद्युत तारा ऐवजी केबल टाकावी व या ठिकाणी जीवित हानी होणार नाही याची दखल घेऊन काम करण्यात यावे. बऱ्याच दिवसापासून आपले कर्मचारी रात्रंदिवस काम करून या तारा दुरुस्त करत असतात रात्री-बेरात्री तीन-तीन चार-चार वेळा त्यांना त्रास सहन
करावा लागतो व विद्युत ग्राहकांचे बोलणे खावे लागते. परिसरात केबल चा वापर केल्यास कर्मचारी व विद्युत ग्राहकांचे त्रास वाचेल व सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल असे करावे
बजरंग चौक ते बस स्टँड पर्यंत विद्यार्थी,महिला, नागरिक, बसेस, कार, बैलगाडी,ट्रॅक्टर, मोटरसायकल यांची खूप गर्दी असते कृपया विद्युत तारा काढून त्वरित केबल लावावी व अशी कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याची वीज वितरना कडून काळजी घ्यावी.
२१नोव्हेंबर रविवारी १५ ते २० वेळा लाईन बंद झाली, तारा तुटल्या, स्पर्किंग झाले असे या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून होत आहे. कर्मचारी पण त्रस्त व विद्युत ग्राहक ही त्रस्त आहे. बऱ्याच वेळा लाईन ८ ते १० तास बंद असते ,लाईन बंद होणार नाही याचा नियोजन, तपासणी करून योग्य ती उपाय योजना करावी. या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी अंतुर्ली शहर काँग्रेस कमिटीचे भैय्या शेख मुक्ताईनगर उपाध्यक्ष काँग्रेस अनिल वाडीले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.