अन त्या नोटिस ची होळी भाजप ने संपूर्ण जिल्ह्यात केली

0

प्रतिनिधी/ वर्धा :

पोलीस बदली भ्रष्टाचार , तसेच गेल्या अडीच वर्षात वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय विभागामध्ये केलेल्या गैरप्रकारांची चौकशी होऊ नये तसेच हे सांगेल तसा कायदा, विरोधकांना संपविण्याचा प्रकार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश व स्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वेगळा केस मध्ये गुन्हे दाखल करून विरोधकांना लोक नामशेष करण्याचा कुटील डाव शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व मुख्यमंत्र्यांनी नेतृत्वात केला आहे परंतु लोकशाही मध्ये भारतीय जनता पक्ष ही लढाई जनतेच्या सन्मानाची असून जनतेचा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्यामुळे जनआंदोलन करून देवेंद्र फडणवीस सभा भाजपाच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभी असल्याचा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष सुनील गफाट यांनी दिला
आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थानिक भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली तसेच लोकशाही बचावासाठी गोरगरिबांच्या सेवेसाठी समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (आर्वी नाका) वर्धा चौक येथे भारतीय जनता पक्षाने जिल्हा भाजपा अध्यक्ष सुनील गफाट,व वर्धा विधानसभेचे आमदार श्री डॉ.पंकज भोयर यांच्या नेतृत्वात निदर्शने करून नोटीस ची होळी करण्यात आली.यावेळी भाजपा प्रदेश सचिव श्री राजेश जी बकाने, भाजपा सरचिटणीस श्री अविनाश जी देव,सरचिटणीस अतुल जी तराळे, सरचिटणीस श्री प्रशांत जी बुर्ले, जयंत कावळे, गिरीश कांबळे, वर्धा तालुका अध्यक्ष, पवण परियाल, शहर अध्यक्ष, निलेश किटे, सर्व भाजपा पदाधिकारी,महिला मोर्चा, युवा मोर्चा, चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
लोकशाही तसेच केंद्रीय यंत्रणा वर दोषारोपण करून आपला भ्रष्टाचार रोखण्याचा प्रकार व आपला भ्रष्टाचार ला शिष्टाचाराच्या स्वरूप देऊन महाराष्ट्राचा अपमान अशा भाषा करून भ्रष्टाचारी तसेच देशद्रोही दाऊद इब्राहिम चे संरक्षक नवाब मलिक यांचा बचाव करणाऱ्या साठी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून लोकशाहीमध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी करत असेल तरी जनता जनार्दन ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते असून लोकशाही बचावासाठी भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र स्तरापासून तर गाव पातळीतील कार्यकर्ता संघर्ष करण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई केल्यास भाजपात आंदोलन करेल.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह राज्यातील भाजपा नेते तसेच जिल्हा पातळीच्या नेत्यांच्या विरोधात षड्यंत्र शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी करत असून त्यांच्या याद्या पोलीस विभागाच्या माध्यमातून करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न व लोकशाही विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला तरी आणीबाणी लागणाऱ्या काँग्रेसला या देशातून हात पार केले आहेत तसेच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्राची जनता राहणार नाही 13 कोटी जनता फडणवीस व भाजपा नेत्यांच्या व कारवाईचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजपा महानगर अध्यक्ष सुनील गफाट यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!