वर्धा / मागच्या वर्षी मॉडेल हायस्कूल तळेगाव श्यामजीपंत येथे शालेय सायन्स एज्युकेशन स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अनेक अनेक तरेचे मॉडेल तयार करून आणले होते त्यामध्ये मॉडेल हायस्कूल चा विद्यार्थी आदित्य राजेंद्र खंडारे यांनी टाकाऊ वस्तु पासून कम खर्चात गॅस व गोबर गॅस तयार केला होता ते आदित्य चे मॉडेल शाळेमधून उत्कृष्ट असे ठरले आणि कमखरचा मध्ये गॅस निर्मिती केल्याबद्दल त्याला प्रथम क्रमांक देण्यात आला त्याच्यासोबत सरवेस दळवळकर सुद्धा होता या प्रोजेक्टचे निरीक्षण तांबोळी सर व बनसोड सर यांनी केले होते त्यावेळेस मुख्याध्यापक पद्माकर जूबडेसर व क्लास टीचर कडू मॅडम उपस्थित होत्या त्याला प्रमाणपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षकांनी व शिक्षिकेंनी सुद्धा आदित्यला शुभेच्छा दिल्या.