आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते काजी वार्ड येथील समाज मंदिराचे लोकार्पण

0

 

हिंगणघाट / ईकबाल पहेलवान :

संविधान दिनाचे औचित्य साधुन स्थानिक काजी वार्ड येथे आमदार समिर कुणावार यांचे हस्ते समाज भवनाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
काजी वार्ड परिसरातील नागरिकांची समाज मंदिर भवनाची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती,आमदार कुणावार यांनी या लोकाभिमुख मागणीची दखल घेऊन आमदार निधितुन या समाज भवन वास्तुची निर्मिती केल्याने परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त करीत आमदार कुणावार यांचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक शुभांगी डोंगरे,अमन काळे,नगरपालिका अभियंता तळवेकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते,यावेळी सामाजिक कार्यकर्ते नानू एंकेश्वर,सुनिल डोंगरे,अमोल खंदार, महादेव डोंगरे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत डोंगरे यांनी केले, तर प्रस्ताविक अशोक मेश्राम यांनी केले, कार्यक्रमाच्या समारोपानंतर काजल डोंगरे हिने उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!