आयटकच्या वतीने जागतिक परिचारिका दिवस साजरा…

0

परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना बळकट करा–दिलीप उटाणे.

वर्धा / आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य कंत्राटी नर्सेस युनियन राज्य कमिटीच्या वतीने 12 मे 2024 रोजी जागतिक परिचारिका दिवस संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य कार्याध्यक्ष रेखा टरके उपाध्यक्ष अमिता नागदेवते सरचिटणीस संगीता रेवडे राज्य संघटक संजय देशमुख किष्णा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच साजरा करण्यात आला.
परिचारिका ही नेहमीच असो की कंत्राटी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत योग्य काम करून सुद्धा त्यांना पाच टक्के वाढ दिली जात नाही सीआर लिहिताना गुड असे लिहिले जाते त्यामुळे त्यांचा आर्थिक नुकसान होतो असे अनेक अन्याय या परिचारिकांवर केले जातात त्यामुळे परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना बळकट करा असे मत संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नुकतेच अपघातात मृत्यू पावलेल्या परिचारिका अंजली पवार यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच नाईट इंगल्स यांच्या फोटोचे पूजन व मालार्पण करून करण्यात आली
राज्य उपाध्यक्ष अमित नागदेवते यांनी जागतिक परिचारिका दिवसाचे महत्व व परिचारिका बाबत शासनाची भूमिका असे सविस्तर प्रास्ताविक केले त्या पुढे म्हणाल्या आज देशभरात परिचारिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन शासन परिचारिकेच्या गुण गौरव करीत असते परंतु प्रत्यक्षात मात्र तिच्या संकटाच्या वेळी मदत केली जात नाही कोरोना काळात आपले घरदार सोडून इतरांना सेवा देणाऱ्या व जीव वाचवणाऱ्या या परिचारिकांना न्याय दिला जात नाही
कार्यरत असताना ज्या कंत्राटी परिचारिकांचा मृत्यू झाल्यास कुठल्याही प्रकारचं विमा दिला जात नाही शासनाने याबाबत गंभीर विचार करावा अशीही नागदेवते यांनी सांगितले
सायली टक्के रत्नागिरी, वनिता मेश्राम चंद्रपूर अस्मिता लोणारे गडचिरोली तारा साबळे पहिल्या तामोरे पालघर,, पुनम चौधरी जळगाव, मीनाक्षी मोरे नाशिक मोनाली खांडेकर अमरावती भाग्यश्री काजगे ठाणे, गाडेकर संभाजीनगर , प्रतिभा इंगळे कल्याण ज्योती भारती वर्धा वैशाली वाघ जळगाव वर्षाराणी परभणी, लक्ष्मी माळी नंदुरबार. रेश्मा कोकणी धुळे मंदा बनकर चंद्रपूर इत्यादी परिचारिकांनी आपले मनोगत व्यक्त केले
परिचारिका कर्तव्याची शपथ घेण्यात आली
आयटकच्या वतीने कॉम्रेड मधू कदम, कॉ. तांबे यांनी राज्यातील उपस्थित सर्व सर्व परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले
संचालन रेखा टरके तर आभार प्रदर्शन संगीता रेवडे यांनी केले.

साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!