आरोग्य संपदे करिता गाव स्वच्छ ठेवणे गरजेचे आ.रणजीत कांबळे

0

वर्धा जिल्हातील भिडी येथील श्रमदान स्वच्छता हिच सेवा उपक्रम मोहिम

आपले घर स्वच्छ ठेवण्याकरिता मोठे परिश्रम घेण्यात येते त्याचप्रमाणे गाव स्वच्छ ठेवण्याकरिता परिश्रम घेतल्यास आपले आरोग्य चांगले राहील आणि आपल्याला दवाखान्याची वाट धरावी लागणार नाही.गाव स्वच्छ ठेवणे सरपंच किंवा सदस्याचे काम नसून प्रत्येक नागरिकांचे गाव स्वच्छतेकडीता परिश्रम घेणे अत्यंत गरजेचे आहे असे मत आमदार रणजीत कांबळे यांनी स्वच्छता ही सेवा श्रमदान संकल्पचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
देवळी तालुक्यातील भिडी येथील ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता हीच सेवा श्रमदान संकल्पनाचे उद्घाटन प्रसंगी आ.रणजीत कांबळे स्वच्छता मोहीम मध्ये सहभागी झाले होते.या प्रसंगी तहसीलदार दत्तात्रय जाधव, गटविकास अधिकारी सुरेश हजारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मनोज वसु,सरपंच सचिन बिरे,उपसरपंच अतुल खेत्री,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.स्वच्छता मोहीम प्रास्ताविक माहिती गटविकास अधिकारी सुरेश हजारे यांनी सांगितले की १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर स्वच्छता महाश्रमदान उपक्रम राबवण्यात येत आहे.या अभियानाची सुरुवात भिडी या गावापासून सुरू करण्यात आली असून इतरही गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.प्रत्येकाने या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ ठेवावे ठरवण्याचा आवाज याकरिता प्रत्येकाने परिश्रम घेण्याचे सांगितले. स्वच्छता जनजागृती करण्याकरिता ग्रामपंचायत पासून आठवडी बाजार,ग्रामपंचायत परीसर,तसेच गावातील परिसर,ग्रामीण रुग्णालय परिसर,स्वछ करन्यात आला.यामध्ये बचत गटाच्या महिला भजनी मंडळी, शाळेचे विद्यार्थी,अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका,ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य सेविका,वैद्यकीय चमु, यांचा या उपक्रमात सहभाग नोंदवून स्वच्छता मोहीम राबवली.
तसेच स्वच्छता मोहीम मिरवणुकीला देवळी विधानसभा चे आ.रणजित कांबळे यांनी हिरवी झेंडी दाखून स्वछता उपक्रमाला सुरवात केली व या उपक्रमाचा समारोप ग्रामीण रुग्णालय येथे झाला.या उपक्रमामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रमोद कोडापे,पंचायत समिती विस्तार अधिकारी दिलीप ढोणे,पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रमोद बिडवाईक,कृषी अधिकारी अनिल आदेवार,सचिव प्रमोद चौधरी,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष मयूर डफळे, तालुका समन्वयक पाणीपुरवठा संपदा बोधनकर,आरोग्य विभाग अमित गावंडे,नितेश ढोपे,रुपाली कुबडे,सुमती करलूके,बंडू शेंडे,आदींचा या स्वच्छता मोहीमध्ये सहभाग होता.तसेच समारोपप्रसंगी प्रास्तविक सरपंच सचिन बिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रमोद कोडापे तर संचालन शोभा मेंढे यांनी केले.

सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!