आर्वीच्या कदम रुग्णालयातील औषधी साठा नेमका कुठला?
प्रतिनिधी/ वर्धा :
अल्पवयीन मुलीच्या गर्भपातानंतर चर्चेत आलेल्या कदम हॉस्पिटल मध्ये सापडलेला सरकारी रुग्णालयातील औषधी साठा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून वितरित झालेल्याशी जुळून आलेला नाही. त्यामुळे हा औषध साठा वर्धा जिल्ह्याबाहेरून पुरविण्यात आल्याचा संशय बळावला आहे. आरोग्य संचालकाच्या यादीतून हा औषधसाठा आता शोधला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकारचे अवैद्य गर्भपाताचे धागेदोरे संपूर्ण विदर्भात असल्याचा संशय बळावला आहे. आर्वीच्या कदम हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीचा गर्भपात झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोग्य विभागाकडून चौकशी केली जात आहे. रुग्णालयाचा परिसर सील करून परिसरातील संशयास्पद मिळणारे सर्व साहित्य जप्त करण्यात तपास यंत्रणेच्या भर आहे. हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर रेखा कदम यांचा यांच्या घर आणि रुग्णालयातून गर्भपातासाठी वापरली जाणारी 42 प्रकारची सरकारी औषधे सापडली. आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुट्टे, डॉ. मनीषा नासरे, डॉ. राजेंद्र कुडे, महसूल विभागाचे प्रतिनिधी मगर, पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या पथकाकडून हा साठा जप्त करण्यात आला हा साठा नेमका कुठून आला याची चौकशी साठी एफडीएने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय आर्वी पत्रव्यवहार केला पण जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून वितरित साठ्याची कदम हॉस्पिटल चौकशी जुळून येत नाही. त्यामुळे आता आरोग्य संचालक यांच्याकडून विविध जिल्ह्यातील वितरित साठ्यांचा शोध घेतला जाणार आहे बॅच नंबर च्या मदतीने हा साठा जो विलाज आहे असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आर्वी हे अमरावती जिल्ह्यातील निगडित आहे बरेचदा औषध साठा अमरावती वरून मागविला जातो त्यामुळे पुढील काळात अमरावती आरोग्य विभागातील औषध साठा देखील पडताळून पाहायला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.