आर्वी आगारातील चालकाचा अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न
![](https://sahasiknews.com/wp-content/uploads/2021/12/arvi-craim.jpg)
क्राईम प्रतिनिधी/ वर्धा:
दिवाळीपूर्वीपासून रापमचे कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून विलीनीकरणाचा लढा देत आहेत. या आंदोलनात सहभागी असलेल्या रापमच्या आर्वी आगारातील कायमस्वरूपी चालकाने अंगावर रॉकेल टाकून जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत चालक २८ टक्के भाजला आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती स्टेबल असल्याची माहिती आहे.. अरुण शिवाजी माहोकार असं जखमी चालकाचे नाव आहे… वेतन झालं नसल्यान आणि आर्थिक अडचणीतून मनोधैर्य खचलेल्या अरुण यांनी राहत्या घरी अंगावर रॉकेल घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच जखमी अरुण यांना तातडीने आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेय.. त्याची प्रकृती स्टेबल असल्याची माहिती आहे..