आष्टी तालुक्यात एमआयडीसी व्हावी याकरिता आमदार दादाराव केचे यांचे अधिवेशनात मागणी आष्टी शहीद
आष्टी तालुक्यात एमआयडीसी व्हावी याकरिता आमदार दादाराव केचे यांचे अधिवेशनात मागणी
आष्टी शहीद
आष्टी तालुका हा देशात स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य चळवळीचे अग्रदूत महात्मा गांधी व आपल्या क्रांतिकारक खंजिरीतून स्वातंत्र्याची गर्जना करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोन महापुरुषाचे मोठे योगदान आहे. या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आष्टी क्रांती भूमी क्रांतीची बीजे तेव्हाच रोवली गेली जेव्हा या महापुरुषांचे आगमन या क्रांती भूमीत झाले. अशा या शहिदाच्या भूमीचा विकास व्हावा याकरिता आष्टी तालुक्यात औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) निर्माण व्हावी याकरिता आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी अधिवेशनात मागणी केली आहे.
विस्तवृत्त असे कीआष्टी तालुका हा स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य वीरांची भूमी म्हणून दिल्लीच्या तक्त्यावर सुवर्णा अक्षरात कोरल्या गेलेल्या अशा या शहीद भूमितील बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळावे रोजगार मिळावा तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आष्टी तालुक्यात एमआयडीसी निर्माण व्हावी याकरिता गेल्या कित्येक वर्षापासून मागणी प्रलंबित आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन अप्पर वर्धा धरण प्रकल्पात गेल्याने या ठिकाणी बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने उद्योग निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून एमआयडीसी होण्याकरिता आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात मागणी केली असून राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सावंत यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.