🔥आष्टी तालुका सरपंच संघटनेचे विविध मागण्यांसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
आष्टी (शहीद) -/ बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कामबंद आंदोलन पुकारले असुन सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी आष्टी तालुका सरपंच संघटनेने तहसीलदार,आष्टी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांना नुकतेच निवेदन दिले आहे.बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष निघृण, निर्दयी,आणि निष्ठुर अशा विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली.अशा पद्धतीचा बळी महाराष्ट् राज्यातील कुठल्याही सरपंच बांधवांचा जाऊ नये.यासाठी विविध मागण्यांसाठी तहसीलदार आष्टी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.यामधे (१) सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांना सरंक्षण कायदा करण्यात यावा. (२) प्रत्येक ग्रामसभेला पोलीस सरंक्षण अनिवार्य करण्यात यावे. (३) संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. (४) संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरी देण्यात यावी.(५) मस्साजोग येथे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे स्मारक उभारण्यात यावे. (६) सरपंचांना विमा सरंक्षण व पेंशन लागु करण्यात यावी.आदी मागण्यां शासनाने मंजुर कराव्या यासाठी निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे अंकीत कावळे, प्रशांत कठाणे, सुनील साबळे,विनोद सोनोने,प्रविण ठाकरे,प्रकाश गायकवाड,दिलीप भाकरे, सागर कळसकर, इत्यादी उपस्थित होते.