आ. चंद्रकांत पाटील यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट:गुन्हा दाखल

0

मुक्ताईनगर / पंकज तायडे:

मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांचे विषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केले या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल आमदार चंद्रकांत पाटील यांचा अवमान होईल अशा पद्धतीत फेसबुक पोस्ट करून बदनामी करणाऱ्यांचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात वृत्त असे की, शिवसेना शाखाप्रमुख गणेश आशोक टोंगे( रा. मुक्ताईनगर) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, त्यांना काल रात्री सव्वा आठच्या सुमारास तालुक्यातील तालखेडा येथील दीपक गजानन वाघ या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक वर आमदार चंद्रकांत पाटील त्यांची बदनामी करणारी पोस्ट टाकण्यात आल्याची माहिती दिली. याबाबत माहिती घेतली असता. अशोक गावंडे नावाच्या फेसबूक प्रोफाईलवर हा प्रकार घडल्याचे दिसून आले.
मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा आणि कोहाला येथील भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. या पक्ष प्रवेशा प्रसंगी च्या फोटोवर अशोक गावंडे याने डुकरे, ससे आदीसह अन्य प्राण्यांचे फोटो टाकून ते आपल्या प्रोफाईलवरून शेअर केल्याचे दिसून आले.
यासोबत आमदार पाटील यांच्या फोटो वरही हाच प्रकार करण्यात आल्याचे नियर निदर्शनास आले. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच बदनामी झाल्याच्या कारणा वरून गणेश अशोक टोंगे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार अशोक गावंडे( रा .मुक्ताईनगर) यांच्या विरोधात रात्री उशिरा भादवी कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!