इस्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात, तपासणीनंतर सत्य समोर येणार

0

प्रतिनिधी / वर्धा :

अवकाशातून पडलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो चे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात आले होते. 2 एप्रिल रोजी लाखो लोकांनी अवकाशात आगीचे लोळ उठताना बघितले होते. यातून वस्तू स्वरुपात समुद्रपूर तालुक्यातील दोन गावे आणि हिंगणघाट तालुक्यातील दोन गावांत धातूची रिंग आणि काही सिलिंडरसारखे दिसणारे गोळे सापडले होते. नागरिकांत दहशत पसरली असतानाच जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतर इस्रोचे पथक सहा दिवसानंतर जिल्ह्यात दाखल झाले आणि त्यांनी सदर वस्तू ताब्यात घेतल्या आहे.
अवकाशातून पडलेल्या काही वस्तू समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर काही वस्तू गिरड तसेच हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये पडल्याचे समजले. पोलिसांनी अवकाशातून पडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. इस्त्रोशी पत्रव्यवहार केला. इस्रोचे शास्त्रज्ञ शाहजहान एन. आणि मयुरेश शेट्टी ही दोन शास्त्रज्ञांची चमू समुद्रपूर येथे 8 रोजी रात्री दाखल झाली. त्यांनी 2 सिलिंडरसारखी वस्तू तपासणीसाठी ताब्यात घेतली. तर शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गिरड पोलीस ठाणे गाठून 2 गोळे ताब्यात घेतले. तर हिंगणघाट पोलिसांकडून अवकाशातून पडलेले धातुच्या रिंगचे पत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोन्ही शास्त्रज्ञांनी संपूर्ण वस्तूंची पाहणी केली. इस्रोच्या वाहनातून या सर्व वस्तू तपासणीसाठी नेल्या जाणार आहेत. त्याचे परिक्षण केल्यानंतर या वस्तूबाबत नेमका अहवाल येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!