ऑटो दुचाकींची धडक, एक ठार 2 जखमी
Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा:
भरधाव जाणार्या एम. एच. 32 ए. आर 4190 क्रमांकाच्या दुचाकीने समोरून येत असलेल्या एम. एच. 31 सी. व्ही. 6709 क्रमांकाच्या ऑटोला धडक दिली. यात दुचाकी रस्त्यावर पडून एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. हा अपघात सेलू बाजार समिती समोर सुकळी मार्गावर घडला.
आनंद ब्राह्मणे (52) रा. गडवी ता. बाभुळगाव जि. यवतमाळ असे मृतकाचे तर विकास तावडे (23) व संगीता तावडे (35) दोघेही रा. जुवाडी अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद ब्राह्मणे हे जुवाडी येथे आपल्या मुलीकडे आले होते. सेवाग्राम येथील रुग्णालयात भर्ती असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी म्हणून नातवाच्या मोपेड दुचाकीने ट्रिपल शीट जुवाडी येथून सेवाग्राम जाण्यासाठी निघाले. सेलूजवळ येताच सुकळी रोडवर बाजार समितीसमोर भरधाव दुचाकी ही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणार्या ऑटोला धडकली. त्यामुळे दुचाकीवर असलेले तिघेही रस्त्यावर पडले. यात आनंद ब्राह्मणे यांच्या डोक्याला जबर मार लागला. नागरिकांनी त्यांना सेवाग्राम येथे हलविले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. तर विकास तावडे व संगीता तावडे हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे.
याप्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सेलू पोलिस करीत आहे.