कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध नोंदवित राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वर्धेत दुग्ध अभिषेक

0

 

प्रतिनिधी/ वर्धा:

सर्व समाजाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्यात शाई फेकून विटंबना करण्यात आली. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवीन्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अभिजीत फाळके पाटील यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा राष्ट्रवादी कडून स्थानिक शिवाजी पुतळा वर्धा येथे सर्व राष्ट्रवादीच्या पदधिकाऱ्यांनी एकत्र येत जाहिर निषेध नोदविला. यावेळी सर्व समाजाचे आराध्य दैवत असलेले जाणता राजा छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजुभाऊ वाघमारे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव शिवराज शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे युवक उपाध्यक्ष प्रवीण काटकर, रितेश घोगरे, स्नेहल मानकर, योगेश घोगरे, नावेद शेख, दीपक आडेपवार, हर्षल सायरे, अभिषेक पालेकर, प्रकाश जिंदे, विठ्ठल दांडगे, सतीश गवळी, राजदीप वाघमारे, सचिन घोडे, विवेक लोहकरे, शेखर सोनटक्के, शुभम उगेमुगे, कमलेश जीवने, गगन आंबटकर, मुकुल दिघोरे, राहुल लोंडे, भूमा आडे, सिद्धार्थ नगराळे, स्वप्नील कांबळे, वैभव पधराम, संजय नन्हे, यश नन्हे, रूपेश शेळके आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत असून तमाम शिवप्रेमी मोठ्या संख्येने यात सहभागी होता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!