कार टेम्पोची जोरदार धडक; १२ जण जखमी
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ देवळी:
देवळी मार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मजूरांना घेवून जाणाऱ्या एका वाहनाला भरधाव वेगानं जाणाऱ्या कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात मालवाहू वाहनातील चालकासह १० महिला जखमी झाल्या आहेत. तर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल केले. सालोड हिरापूर येथील विजय दाते शेतीच्या कामासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी मुलासह दहा जण प्रवास करत होते. देवळी महामार्गावर जयस्वाल यांच्या धाब्याजवळ वर्धेवरून देवळीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मालवाहू वाहनाला धडक दिली.या धडकेत मालवाहू ऑटो रस्त्याच्या कडेला जाऊन धडकला तर कार शंभर मीटर अंतरावर जाऊन उलटली.
या अपघातात ऑटो चालक विजय दाते यांच्यासह मनीष दाते,जया दाते, आदित्य घडमोडे,अनिता घडमोडे,सीमा खोबरे,रेखा वरठी सह अन्य तीन मजूर जखमी झाले. तर कारमधील चालकासह दोघे जण जखमी झाले आहेत.. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.