केळझर येथे ट्रॅव्हल्स आणि एसटी बसचा भीषण अपघात; ९ प्रवासी जखमी…

0

सिंदी (रेल्वे)-/ समोरून भरधाव येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सने एसटी महामंडळाच्या बसला जबर धडक दिली. त्यात ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज ता. २२ मे बुधवारी रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास केळझर येथे घडली. जखमींमध्ये ३ लहान मुलांचाही समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची एमएच ४० एक्यू ६३२७ क्रमांकाची बस ही वर्ध्याहून नागपुरच्या दिशेने जात होती. दरम्यान केळझर जवळ जुनगड कडून भरधाव येणाऱ्या एमएच ४० सिटी १९३८ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने शहिद हरिभाऊ लाखे स्मारक चौकात वळणावर बसला जोरदार धडक दिली. ट्रॅव्हल्स ही टाकळघाट येथून जुनगड मार्गे आजनसरा येथे वरात घेऊन जात होती. यात दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता.अपघातात बसमधील दोन तर ट्रॅव्हल्समधील ७ असे एकूण ९ जण जखमी झालेत. यात बसचा वाहक गणेश सहारे वय ४२ वर्धा आगार यांच्या डाव्या पायाला आणि हाताला तर बसमधील प्रवासी आर्या मंगेश लसुंते वय २२ रा. मानस मंदिर वर्धा यांच्या डोक्याला इजा झाली. खाजगी ट्रॅव्हल्समधील जखमींत सोहम महेंद्र ईटनकर वय ११ रा. हिंगणा या बालकाचे दोन्ही हात फॅक्चर झाले. तर लंकेश प्रभाकर बावणे यांच्या डोक्याला व त्यांची दिड वर्षांची चिमुकली राधा हिच्या खांद्याला इजा झाली. तेजस कृष्णा मेहर वय ९ रा. नागपूर ह्याच्या डोक्याला, शामराव सागार वय ३५ रा. टाकळघाट यांच्या गळ्याला, गिता दामोदर बारई वय ५४ रा. बुट्टीबोरी व तृप्ती दिलीप तिवारी वय २५ रा. बुट्टीबोरी यांच्या डोक्याला इजा झाली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने जखमींना आधी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अपघातानंतर खाजगी ट्रॅव्हल्सचा चालक हा घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. बंडु कावळे रा.टाकळघाट यांचा आजनसरा येथे स्वयंपाक होता. नातेवाईक व गावातील लहान मोठे एकुण ५० जण ट्रव्हल्स मध्ये बसले होते. फारुख शेख मित्रपरिवार, पोलीस पाटील सुरेश खंडागळे व गावातील नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. सेलू पोलीस ठाण्याचे विक्रम काळमेघ, सुरेश ‌ मडावी, लोकेश‌ पवनकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत अपघातास कारण ठरलेली चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस पोलीस ठाण्यात जमा केली. राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी धायरे यांनी आपल्या टिमसह घटनास्थळी भेट दिली.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज -/24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!