केसरीमल नगर विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनात यश.
सिंदी (रेल्वे) :16 व 17 डिसेंबर या तारखेला पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनामध्ये केसरीमल नगर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.केसरीमल नगर विद्यालयाचे विद्यार्थी कु. कार्तिक अटेल व आदित्य काळबांडे यांनी सादर केलेल्या “स्मार्ट हाउस” या प्रतिकृतीला माध्यमिक (वर्ग ९ ते १२) गटामधून तालुकास्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त झाला व या प्रतिकृतीची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे. तसेच विज्ञान प्रश्नमंजूषा या स्पर्धेत कार्तिक अटेल (वर्ग १०) व आदर्श बेले (वर्ग) यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच गुडशेफर्ड विदयालय सेलू येथे पार पडलेल्या विज्ञान मेळाव्यात देखील आमूच्या विद्यालयाचे विद्यार्थी कार्तिक अटेल, अमित अष्टेकर या सर्व विद्यार्थ्यांना हायस्कूल विभागाचे विज्ञान शिक्षक डी. जी. दाढे या सरांचे मार्गदर्शन मिळालेले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक विलास येखंडे, पर्यवेक्षक अनिल चांदेकर व राजू मडावी तसेच संस्थेचे अध्यक्ष, अतुल टालाटूले, संचालिका निता टालाटूले, संस्थेचे सचिव राजू पात्रीकर व कोषाध्यक्ष दवंडे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज -24