गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड….!

0

🔥गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड….!

🔥विद्यार्थ्यांसह पालकांचा थेट हिंगणा कार्यालयावर धडक – अधिकारी गायब..!

 हिंगणा –/ शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार हिंगण्यात उघड झाला आहे. महात्मा फुले विद्यालय, सुराबर्डी येथील तब्बल १७ विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असतानाही गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना वेळ नाही.
शाळेच्या पेंडिंग रिक्वेस्टला मंजुरी मिळावी म्हणून मुख्याध्यापक विजय पिसे यांच्यासह विद्यार्थी व पालक थेट हिंगणा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गेले. परंतु, गटशिक्षणाधिकारी सौ. हरडे मॅडम स्वतः कार्यालयात हजर नसल्याने पालक व विद्यार्थी नाराज होऊन परतावे लागले.
प्रश्न असा की – विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार ?
वारंवार निवेदन करूनही कारवाई नाही, पालकांना रोजंदारी सोडून कार्यालयात यावं लागतं, तरीही अधिकारी गैरहजर ! हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा गंभीर गुन्हा आहे.
शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी शोभणे यांच्याकडे पालकांनी प्रवेश अर्ज व पेंडिंग रिक्वेस्टची यादी सुपूर्द केली. मात्र ३० सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर संच मान्यता होत असल्याने या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे बारकाईने लक्ष लागले आहे.
या आंदोलन सदृश्य धडकेत विद्यार्थी, पालक, शिक्षक व महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पिसे उपस्थित होते.

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!