गाडी पंक्चर करणाऱ्या लुटारूणा वर्धा पोलिसांनी केले पंक्चर
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
महामार्गावर गाडी हेरायची आणि रस्त्यावर खिडे टाकून गाडी पंक्चर करायची, त्यांनतर गाडीमधील कुटुंबाला हत्यारांचा धाक दाखवत गाडी लुटायची असाच अट्टल गुन्हा करणाऱ्या टोळीला वर्धा पोलिसांनी जेरबंद केले आहे. तब्बल 9 आरोपीना पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करीत ताब्यात घेतले आहे. 35 ते 40 कर्मचाऱ्यांची टीम या लुटरूंचा पाठलाग करीत होती. गडावर असल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले. कळम आणि उस्मानाबाद येथील ही टोळी असून समुद्रपूर आणि तळेगाव श्यामजी पंत येथे या टोळीने गाडी पंचर करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. यात दोन कुटुंबाना लुटण्यात आले. यापूर्वी धुळे आणि अमरावती जिल्ह्यात देखील अशाच घटनांमध्ये ही टोळी सामील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.