घरफोडी करणा-या चोरट्याना सेवाग्राम पोलीसांनी केली अटक

0

प्रतिनिधी / वर्धा :

विनोद नत्थुजी कोल्हे वय ५१वर्ष रा हावरे ले, आऊट सेवाग्राम यांनी दि. २३ / ९/ २०२१ रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, दि 23/09/2021 रोजी ते त्यांचे घराला कुलुप लावुन मुळ गावी तळोदी येथे गेले असता अग्यात चोराने त्याचे घराचे लाँक तोडून घरातले लोखंडी कपाटातु सोन्याची अंगठी 4 ग्राम वजनाची कि 10000, रू , चांदीच्या तोरड्या व जोडवे कि 500 रू , HP कंपनी चा लँपटाप कि 10000. Mi कंपनी चा मोबाईल 2000 रु चा असा एकुन 22500 रु चा माल कोणीतरी अग्यात चोरट्यांनी चोरून नसल्याचे रिपोर्ट वरून अपराध क्र 545/21 कलम 457, 380 भादवी चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
त्यानंतर फिर्यादीला सोन्याची अंगठी 4 ग्राम वजनाची कि 10000, रू ची चांदीच्या तोरड्या व जोडवे कि 500 रू चा माल घरीच मिळुन आला
पो.स्टे बेलतरोडी येथे आरोपी शरद उर्फ भुर्या शामराव कातलाम वय 22 वर्ष , अशोक उर्फ चच्चु दिपक मडावी वय 25 वर्ष दोन्ही रा चिंचभवन नागपूर यांना अटक करून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्याचे कडुन HP कंपनी चा लँपटाप कि 1000 , Mi कंपनी चा मोबाईल 2000/- रु चा असा एकुन 12000/- रु चा माल जप्त करण्यात आला करिता सदर आरोपीची ट्रान्सफर कार्यवाही करून पोस्टे सेवाग्राम चे गुन्ह्यात अटक करून गुन्हा उघडकीस आणला
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके,उपविभागीय पोलीस अधिकारी पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे पोलीस स्टेशन सेवाग्राम य‌ाचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, जयेश डांगे, आशिष लाडे पोशि पवन झाडे, प्रगती झामरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!