चक्रीवादळ नुकसान भरपाईची शासनाकडून आलेली मदत तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी -प्रमोद सौंदळे

0
  1. चक्रीवादळ नुकसान भरपाईची शासनाकडून आलेली मदत तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी -प्रमोद सौंदळे

 

मुक्ताईनगर, पंकज तायडे

जिल्ह्यासह मुक्ताईनगर तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या चक्रीवादळात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी भुईसपाट झाला आहे व त्या अनुषंगाने प्रशासनाने पंचनामे करून शासनाने मदत जाहीर केली होती परंतु ती मदत वेळेत न मिळाल्याने मुक्ताईनगर मतदारसंघाचे मा.आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी विधानसभेत नुकसान भरपाईच्या मदत संदर्भात प्रश्न उपस्थित करून तात्काळ मदत खेचून आणली व त्या अनुषंगाने शासनाने तालुका प्रशासनाकडे मदत वर्ग केली ही मदत जमा होऊन जवळपास एक महिना उलटूनही तालुका प्रशासनाच्या उदासीनता व सुस्त कारभारामुळे हि रक्कम अद्यापही शेतकर्यांना मिळालेली नाही व एक प्रकारे तालुका प्रशासनाने शेतकर्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसून येत आहे . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ वर्ग न केल्यास बहुजन मुक्ती पार्टीतर्फे तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले निवेदन देतेवेळी बहुजन मुक्ती पार्टी लोक सभा प्रभारी प्रमोद सौंदळे शांताराम बेलदार सोपान सपकाळे सरपंच मेढोदे . सुलतान पठाण वामन पाटील एकनाथ धनगर गंभीर पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!