जगभरात व्हाट्सअपला ग्रहण; तब्बल दोन तास व्हाट्सअप ॲप बंद

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात तब्बल दोन तास WhatsApp बंद झाले. जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन असल्याचा मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या.
दरम्यान, व्हॉट्सअॅप सुरु झाले असले तरी समस्येबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर, दुसरीकेड ट्विटरवर व्हॉट्सअॅप डाऊन असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
व्हॉट्सअप डाऊन झाल्याने लाखो युजर्सला अडचणींचा सामना करावा लागला. ऐन दिवाळी सणात व्हॉटअप डाऊन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय येत आले.
दरम्यान, मेटाच्या प्रवक्त्याने व्हॉट्सअपची सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी काम केले जात असल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे व्हॉट्सअप डाऊन झाल्याने ट्वीटरवर मीम्सचा पाऊस सुरू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!