जनावरांची अवैधरित्या तस्करी करणारे 5 आरोपींकडून 47,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त…..

0

 

वर्धा -/ स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांचे कडून पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात सतत अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे.अशातच आज 23 जानेवारी 2025 रोजी समृद्धी महामार्गावरून अवैधरित्या जनावरांची निरदयतेने वाहतूक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना माहिती प्राप्त झाली. यावरून समृद्धी महामार्ग विरुल परिसरात नाकेबंदी करीत कंटेनर क्रमांक KA 01 AM 8536 ची तपासणी केली असता त्यात काळया रंगाचे म्हैस जातीचे छोटे बछडे या जनावरांना कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन हालचाल करण्यास पुरेषी जागा नसतांना क्रुरतेने आखुड दोरीच्या सहाय्याने बांधुन नमुद जनावरांना कोणत्याही प्रकारची हवा व प्रकाष येणार नाही अषा बंदिस्तरित्या झाकुण आतील उष्णतेमुळे व्याकुळ झालेले वेदनादायक स्थितीत निर्दयतेने व क्रुरपणे व त्यांचे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता बांधलेले दिसून आले. आरोपी नामे 1) इरषाद इसाक खान, व 32 वर्शे, व्यवसाय – चालक, रा. गांधीग्राम घासेडा जि. नुह (हरीयाणा)2) अब्दुल सला अब्दुल रषीद, वय 40 वर्शे, धंदा – क्लिनर, रा. दारूषिफा जि. त्रिवेंद्रमपुरम (केरळ)3) असलम खान इकबाल खान, वय 24 वर्शे, धंदा – क्लिनर रा. गांधीग्राम घासेडा जि. नुह (हरीयाणा)4) साहुन बठ्ठन, वय 47 वर्शे, रा. बॅगपरी ग्राम, जि. अलवर (राजस्थान)5) राॅबिन अख्तर, वय 23 वर्शे, रा. सबलाना जि. भरतपूर (राजस्थान) यांचे ताब्यातून 1) काळया रंगाचे म्हैस जातीचे छोटे बछडे (रेडे) एकूण 51 नग प्रत्येकी किं 25,000/- रूपये प्रमाणे किंमत 12,75,000/-रूपये तसेच सदर बछडे वाहून नेण्याकरीता वापरण्यात आलेला कंटेनर क्रमंाक के ए 01 ए एम 8536 किंमत 35,00,000/-रू. असा एकूण 47,75,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जनावरे ही आरोपी 6) अकबर अली जलाउद्दीन रा. ईलीपाकोनथ्थु, जि. त्रिवेंद्रमपुरम (केरळ) (पसार) यांचे मालकीची असून ती राजस्थान येथून खरेदी करून केरळ येथे अवैधरित्या वाहतूक करून घेऊन जाताना मिळून आली. सदर जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोदय गौषाळा पडेगाव येथे दाखल करण्यात आले असून आरोपितांविरुद्ध पोलिस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक  अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक  सागरकुमार कवडे, यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि उमाकांत राठोड, पोहवा हमीद शेख, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अभिषेक नाईक, चालक शिवकुमार परदेशी, अखिलेश इंगळे, रितेश गेटमे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!