जयपूर येथे एक दिवसीय कबड्डी सामने संपन्न

0

 

प्रतिनिधी/ सेलू :

तालुक्यातील जयपूर येथील नवप्रभात ग्रा.वि. संस्थे द्वारे
नवप्रभात स्पोरटीग क्लब व शंभुभारती महाराज स्पोर्टिंग क्लब द्वारा आयोजित वर्षे २३ वे कबड्डी सामन्याचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दि.१३ ला मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यात ६० कीलो च्या आतील २६ चमूने सहभाग नोंदवून प्रथम पुरस्कार १५००१र.रोख न्यू धरती क्रिडा मंडळ दिंदोडा.द्वितीय पुरस्कार १०००१रू.रोख .जय बजरंग क्रीडा मंडळ कोहळा. तिसरा पुरस्कार ७००१रू.रोख.जय कलिमेत बाबा क्रीडा मंडळ करकसुर.चतुर्थ पुरस्कार ५००१रू.रोख जय हिंद क्रीडा मंडळ टाकळी किटे या संघाने पटकावले.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून लाभलेले काँग्रेसचे जेष्ठनेते डॉ.शिरीष गोडे.सामाजिक कार्यकर्ते नितीन फासगे.अविनाश देशमुख दिलीप मस्के. गोपाल मस्के.विनोद मापारी. सुरेंद्र फासगे.ग्रा.स.राहूल भांदकर.यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.स्पर्धेत
पंच म्हणून बंडू काटोले.गौतम पाणतावने.रोशन मसराम. बंडू मोहदूरे सुत्र संचालन मंगेश बरडे यांनी तर कबड्डी सामने सुरळीत पाडण्याची जबाबदारी पोलीस पाटील अमित फासगे यांनी सांभाळत उपस्थित राहून सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!