जय महाकाली शिक्षण संस्थेद्वारे ख्यातनाम दिग्दर्शक श्री राजदत्त यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
करण्यात येणार जय महाकाली शिक्षण संस्था व सृजन म्युझिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सूर तेच छेडिता’ दिग्दर्शक राजदत्त यांच्या चित्रपटातील सुमधुर गीतांच्या मैफिलीचे आयोजन. दि.6 नोव्हेंबर 2022 ता सायंकाळी 7 वाजता, अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस मधील शिवशंकर अग्निहोत्री सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री हे राहतील. या कार्यक्रमात राजदत्त यांना संस्कार साहित्य निष्ठा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या गितमैफिलित दिग्दर्शक राजदत्त यांच्या गाजलेल्या चित्रपटाचे जसे शापित, मधुचंद्र, अपराध, पुढचं पाऊल, सर्जा, माफीचा साक्षीदार यातील सुमुधुर गीतांचा समावेश राहील. ग्लॅमर च्या दुनियेत पन्नास वर्षे काम करूनही जमिनीवर आपले पाय घट्ट रोवून उभा असलेला अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे राजदत्तजी, त्यांच मुळगाव वर्धा जिल्ह्यातील दत्तापुर, त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हे वर्धा येथेच झाले.
ते रामनगरमध्ये राहायचे तेव्हापासून अग्रिहोत्री परिवाराशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. ते 15 वर्षापूर्वी वर्धेता येऊन गेले.त्यावेळी ते महाकाली येथे आले व त्यांनी माता महाकालीच्या महाआरती, पूजा अर्चेत सहभागी झाले तसेच त्यांनी चिंतनात्मक भाषण दिले जे सर्वाना ऊर्जा व ज्ञान प्रदान करणारे होते संस्कार भारती शी निगडित त्यांचे कार्य महान आहे, आज वयाच्या 93 व्या वर्षातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
त्यांनी अनेक महान व्यक्तींसोबत कार्य केले ज्यामध्ये राजा परांजपे, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, नाना पाटेकर.ग.रा.कामत यांचा समावेश आहे. वयाची नव्वदी पार केलेल्या परंतु त्याची कुठेच दखल न घेणारे, कसलीही पर्वा न उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या या मनस्वी तपस्वी कलाकाराला वर्धेत आणून त्यांच्या अतुनलनिय कार्याचा गौरव म्हणून त्यांना संस्कार साहित्य निष्ठा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शशिकांत बागडदे, मंजिरी वैद्य अय्यर, अरुण सुरजूसे हे आपल्या अप्रतिम गीत प्रस्तुतीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील, तर राजदत्त यांची मुलाखत व संवाद हे अजेय गंपावार हे करतील. कार्यक्रमाचे संकल्पना संयोजक शशिकांत वागदे संगीत संयोजन महेंद्र ढोले, निर्माती स्वाती हितेश बमनोटे यांची आहे तरी सर्व रसिक जणांनी या गीत संगीत मैफिलीचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.