जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगाचे आमरण उपोषण

0

प्रतिनिधी / नांदेड :

दिव्यांगाच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाला दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला आमरण उपोषण करत असल्याचा निवेदन देण्यात आले आहे. दिव्यांगासाठी अनेक वेळा विविध मागण्याचे निवेदन दिली. व तसेच अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, उपोषण करुन सुध्दा दिव्यांगासाठी असलेल्या अनेक विविध शासकिय योजनेचे शासन निर्णय, परिपत्रके, व दिव्यांगाचे कायदे, आणि नांदेड जिल्ह्यात दिव्यांगासाठी विशेष असलेल्या दिव्यांग मित्र अॅप असुन सुद्धा ग्रामिण भागात, तालुका व जिल्हा पातळीवर सर्व दिव्यांग योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांग व्यक्तीत तिव्र नाराजी पसरली आहे. आणि संजय गांधी निराधार योजने मागील तिन ते चार महिन्यांचे अनुदान वेळेवर न मिळाल्याने या वर्षीची दिव्यांगाची दिवाळी अंधारात झाली आहे. व तसेच लोकप्रतिनिधी व शासनाने दिव्यांगाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दिव्यांगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. दिव्यांगाला मागिल वर्षाचे ५ टक्के दिव्यांग निधी मिळाला नसल्याने दिव्यांगासह त्यांच्या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दिव्यांगाच्या विविध प्रमुख मागण्या:-

३ डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणुन सर्व जिल्ह्यात शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरा करावा, दिव्यांग व्यक्तीला अंत्योदय योजनेचे राशन कार्ड व राशन उपलब्ध करून द्यावे. प्रथम प्राधान्याने घरकुल योजनेत लाभ, दिव्यांगाला व्यवसाय करीता शासकीय व निमशासकीय कार्यालयात २०० स्कैअर फुट जागा, सर्व शासकीय कार्यालयातील दिव्यांगाचे प्रलंबित योजनेचे कामे आणि प्रलंबित युडी आयडी कार्डाला मंजुरी देणे, हदगांव नगर पालिकेतील गेल्या तिन ते चार वर्षात आय.टि.आय उत्तीर्ण दिव्यांग उमेदवाराला अप्रेरेटेशिप म्हणुन कामावर घेणे. ग्रा.प.,न.पं, न.पा.,प.स.,जि.प., म.न.पा यांच्या उत्पन्नानुसार व १५ व्या वित्त आयोगातील निधी आणि आमदार, खासदाराच्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग निधी दिव्यांगाला तात्काळ द्यावा.,दिव्यांगाच्या कामात दिरंगाई करण्याऱ्या अधिकाऱ्यावर सेवा हमी कायदा व दिव्यांग कायदा २०१६ नुसार कायदेशीर कार्यवाही करावी, दिव्यांग मित्र अॅप नांदेड मध्ये दिव्यांगासाठी असलेल्या केंद्रीय व राज्य शासनाच्या सर्व योजनेची माहिती व लाभ , व तसेच जिल्ह्यात दिव्यांगासाठी कार्यरत असलेल्या नोंदणीकृत संस्था व संघटनेची नावे व संपुर्ण माहिती अद्ययावत करावी. दिव्यांग व्यक्ती अंमलबजावणी साठी तालुक्यात व जिल्हास्तरावर एक दिव्यांग समिती स्थापन करून दर महिन्याला या समितीची एक बैठक आयोजित करावी.संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान दर महिन्याला देण्यात यावी. म.ग्रा.रो.हि.योजनेंतर्गत दिव्यांगाला त्यांच्या गावांतच दर वर्षी किमान १०० दिवस काम द्यावे.,दिव्यांग बचत गटांना बॅंक मार्फत कर्ज वितरित करावे. वरील मागण्या २ डिसेंबर पर्यंत पुर्ण मान्य न झाल्यास दिनाक ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व जिल्हातील सर्व दिव्यांगासह तहसिल कार्यालय हदगांव समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत जमीर पटेल, गजानन शिंगणे, शेख फारुख, संजय कापेरावेनोल्लु, कुबेर राठोड, शेख अहेमद भाई, धुरपत सुर्यवंशी, सलमा शेख, प्रियंका राठोड, शेख साजिद, फहीमोद्दीन सरवरी, मारोती लांडगे, शब्बीर बेग,शेख शबाना, अजिंक्य चव्हाण, अफनान शेख रफीक बागवान, बंडु पाटे, शेख इम्रान, समिना बेगम ईत्यादी दिव्यांग व्यक्तीसह त्यावेळी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!