तामसवाडा जलसिंचन प्रकल्पाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन

0

प्रतिनिधी/ वर्धाा:

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व केंद्रीय भुजल सर्वेक्षण विभाग यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या तामसवाडा पॅटर्नवर आधारित जलसंवर्धन प्रकल्पाची माहिती देणार्या पुस्तिकेचे विमोचन नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवशीय अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटनाचे दरम्यान करण्यात आले.
केंद्रीय सडक, परिवहन व राजमार्ग मंत्री तथा विकास पुरूष नितीन गडकरी यांच्या पुढकाराने नागपूर येथील रेशीम बाग मैदानावर चार दिवशीय अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन २४ डिसेंबर रोजी कवीवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमाचे दरम्यान तामसवाडा पॅटर्ननुसार राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती देणार्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
तामसवाडा सिंचन प्रकल्पाच्या पुस्तक विमोचन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, कर्नाटकचे मंत्री अश्वत्थ नारायण, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, केंद्रीय भुजल बोर्ड नागपूरचे संचालक डॉ. प्रभात कुमार जैन, गिरीष गांधी, रवींद्र बोरटकर, आमदार चंद्रशेखर बावणकुळे, महापौर दयालशंकर तिवारी, अॅग्रो व्हिजनचे सदस्य व तामसवाडा पॅटर्नचे माधव कोटस्थाने यांची उपस्थिती होती. तामसवाडा प्रकल्पाची माहिती देतांना माधव कोटस्थाने यांची सांगितले की, पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्था (एनजीओ) वर्धा यांच्या पुढाकाराने तामसवाडा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तामसवाडा येथील पथदर्शी प्रकल्प व त्याचे अनुकरण अनेक गावात करण्यात येत आहे. त्याचे उत्तम परिणाम ग्रामीण भागात व कृषी क्षेत्रात दिसून येत आहे. केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात येत असल्याचेही माधव कोटस्थाने यांनी सांगितले. विमोचन कार्यक्रमाला अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजक सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर, अॅग्रोव्हिजनचे फाऊंडेशन सदस्य सुधीर दिवे, आनंद राऊत, मिलींद टिचकुले, प्रशांत कुकडे, शिरीष भगत, प्रशांत वासाडे, श्रीधर ठाकरे, डॉ. सुनील सहातपुरे, डॉ. पिनाक दंदे, विजय जाधव, नितीन कुळकर्र्णी, सदस्य मीनेश साहू,डॉ. विलास भाले, डॉ. आशीष पातुरकर, डॉ. ए. एस. धवन, डॉ. दिलीप घोष, डॉ. वाय. जी. प्रसाद, एम. जी. शेंबेकर, डॉ. बी.एस. त्रिवेदी, डॉ. पी. जी. पाटील व कृषी प्रदर्शनीत आलेले कृषी तज्ज्ञ,शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!