प्रतिनिधी/ वर्धा:

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालया अंतर्गत अमृतलाल नागर सृजनपीठातर्फे 26, 27 व 28 रोजी आयोजित वर्धा साहित्‍य महोत्‍सवाचे उद्घाटन मंगळवार 26 रोजी 9.30 वा. विश्‍वविद्यालयातील कस्‍तूरबा सभागृहात होईल. लोकसभा सदस्य व माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ उद्घाटन समारंभाचे मुख्‍य अतिथि असतील. या प्रसंगी बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विश्‍वविद्यालय, लखनौचे कुलाधिपती प्रो. प्रकाश बरतुनिया व वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्थानी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल राहतील.
उद्घाटनानंतर ‘जीवनीपरक उपन्‍यास : सृजन समस्‍या’ या विषयावर कस्‍तूरबा सभागृहात 11.15 वा. प्रथम सत्र होईल. सत्राच्या अध्‍यक्षस्थानी प्रो. रामजी तिवारी राहतील. यावेळी पद्मश्री श्री विष्‍णु पण्‍डया, श्री गोविंद मिश्र, प्रो. अभिराज राजेंद्र मिश्र, श्री के. सी. अजयकुमार विचार मांडतील.
दुपारी 3.00 पासून तीन समानांतर सत्र होतील. महादेवी सभागृहात ‘मानस का हंस’ या विषयावर आयोजित सत्राच्या अध्‍यक्षस्थानी डॉ. प्रेमशंकर त्रिपाठी असतील तर वक्‍ता म्हणून प्रो. सुरेश कुमार अग्रवाल, प्रो.अलका पाण्‍डेय, श्री आनंद निर्वाण, डॉ. बीना बुदकी,श्री राजू मिश्र, श्री राकेश मंजुल, अभय जैन, नेहा कौशिक, योगेश कुमार मिश्र विचार मांडतील.
गुर्रम जाशुआ सभागृहात ‘छावा’ विषयावर सुप्रसिद्ध लेखक डॉ. दामोदर खड़से यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्रात प्रो. दत्तात्रय मुरूमकर, डॉ. सतीश पावडे, श्री विकास मिश्र, डॉ. कुलदीप पांडेय, शिवकांत, विष्‍णु कुमार विचार मांडतील.
शिक्षण विद्यापीठाच्या सभा कक्षात ‘बा’ विषयावर आयोजित सत्राच्या अध्‍यक्षस्थानी प्रो. सुमन जैन राहतील. सत्रात वक्‍ता म्हणून डॉ. सुप्रिया पाठक, डॉ. बीर पाल सिंह यादव, डॉ. मुन्‍नालाल गुप्‍ता, डॉ. सूर्यप्रकाश पांडेय, सारिका जगताप, विकास मिश्र विचार मांडतील.
सायंकाळी 5 वा. कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तक लोकार्पण कार्यक्रम कस्‍तूरबा सभागृहात होईल. या प्रसंगी लोकसभा सदस्य व माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ व डॉ. योगेंद्र नाथ शर्मा ‘अरूण’ यांची विशेष उपस्थिती राहील.
सायंकाळी 6.30 वा. शिक्षण विद्यापीठातील मुक्‍ताकाश मंचावर डॉ. हिमांशु वाजपेयी व प्रज्ञा शर्मा
दास्‍तानगोई सादर करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!