दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त डॉ. तानाजी जाधव यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे अभिनंदन

0

 

प्रतिनिधी / चंदपूर:

टायगर ग्रुप ही सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी राज्यातील सर्वात मोठी संघटना असून यंदाया संघटनेचे
संस्थापक डॉ. तानाजी जाधव यांना प्रतिष्टेचा दादासाहेब फाळके पुरकार व गोवा राज्याचा प्रतिष्टेचा नेलसन मंडेला पुरकार मिळाल्याबद्धल महाराष्ट्र राज्य पत्रकार तसेच संपुर्ण राज्यभर अभिनंदन होत आहे. राज्यभर टायगर ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असतात. टायगर ग्रुपच्या माध्यमातून पूरग्रस्त महाड, चिपळुन भागात देखील सुमारे ३७ ट्रक जीवनावश्यक साहित्य व किराणामाल कपडे इत्यादी साहित्य मदतीसाठी पाठवण्यात आले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येऊन महाराष्ट्रात सुमारे ५००० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले आयडॉल तानाजी जाधव यांना वाढदिवसाच्या सामाजिक कार्यातून शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून टायगर ग़ुप तर्फे संपुर्ण राज्यभरात मदत पाठवून सेवाभाव जोपासण्यात आला होता हे विशेष. राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे व राज्य प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव,विदर्भ अध्यक्ष, प्रा .महेश पानसे,सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी डॉ. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!