देवदर्शनाला जाताना कारचा अपघात; तीन भाविकांचा मृत्यू

0

प्रतिनिधी/ वर्धा:

महाशिवरात्रीनिमित्त पचमडी येथे देवदर्शनाला जाताना कारचा अपघात घडला. यात वर्ध्यातील दोघे तर अमरावती मधील एकाचा अपघातात मृत्यू झाला तर एक जण बचावला. ही घटना आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेने गावात शोककळा पसरली. तुषार झामडे यांची कार क्र. महा 02 बिजी 3204 च्या कारने भिंतीला धडक दिल्याने अपघातात समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.
वर्ध्यातील आष्टी येथून काल सायंकाळी 4 मित्र मध्यप्रदेशातील पचमडी येथे भोलेनाथांच्या देवदर्शनाला निघाले. पचमडी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरली जाते यासाठी विदर्भातील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शना जात असतात. नागपूर, अमरावती ,वर्धा यासह इतर जिल्ह्यातील भाविक जातात.यातच काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गौरखेडे आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तुषार ज्ञानेश्वर झामडे व दीपक भाऊराव डाखोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण बचावला असून त्यांचे नाव अद्यापपर्यंत कळू शकले नाही.
मध्यप्रदेश मधील पचमडी येथे जाताना मोरका गावाजवळ रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटल्याने वळनावरील भिंतीला जबर धडक दिली.या धडकेत कारने चार पलटी घेतली. अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन जण जागीच ठार झाले. या घटनेने आष्टी व तीवस्यात शोककळा पसरली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!