देवळीतील तालुका आरोग्य कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
प्रतिनिधी/ देवळी:
स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाश मान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव मधील झाला.तसेच त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षीका म्हणून ओळखले जाते.त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तसेच त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते.सावित्रीबाई आणि त्यांचे पती 1848 मध्ये भिडेवाड्यातील पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली होती.सावित्रीबाई फुले शिक्षण जगतात स्मरणात आहेत.कारण सावित्रीबाई फुले असेच अशा स्त्री होत्या त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी लढा दिला आणि स्त्रियांना शिक्षित करण्याचे काम केले.तसेच सावित्रीबाई फुले कवयीत्री शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या.अशाच महिलांना शिक्षणाचा लढा दिल्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देवळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून यांची जयंती साजरी केली.त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ मोनाली मामीलवार, शेख हुसेन,आरोग्य सहाय्यक पदमा खरसान, तालुका समूह संघटक सचिन कुमरे, तालुका वरिष्ठ पर्यवेक्षक सविता गोहेकर, आरती आडेकार दीपक मेश्राम जयश्री ढोले जयश्री देशमुख आशा सेविका अंगणवाडी सेविका आदींची प्रमुख उपस्थिती होती.