देवळीत ज्ञानभारती विद्यालयाची विद्यार्थिनी प्रथम…

0

देवळी तालुक्यात पाच विद्यालयाने दिले शंभर टक्के निकाल….. ज्ञानभारती विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आर्या सचिन राऊत प्रथम.

देवळी-/बारावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला यामध्ये देवळी येथील ज्ञानभारती विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थिनी कुमारी आर्या सचिन राऊत ही प्रथम आली तिने 86.67% गुण मिळविले तर द्वितीय स्थानी मारिया कनिष्ठ विद्यालयाची कृतिका खोडनकर हिने 83 टक्के गुण मिळविले तृतीय स्थानी मारिया कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रवीण बिस्वार यांनी ८२.६७ टक्के गुण घेतले या सर्वांचे शिक्षकांनी व पालकांनी अभिनंदन केले.देवळी तालुक्यात विज्ञान शाखेचे 12 कनिष्ठ महाविद्यालय आहेत या 12 पैकी पाच महाविद्यालयाने शंभर टक्के निकाल दिलेला आहे यामध्ये देवळी येथील जनता कनिष्ठ महाविद्यालय ,पुलगाव येथील लेबर कॅम्प ,विजय गोपाल येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालय सरूळ येथील सयाजी मोहन कनिष्ठ महाविद्यालय व हिवरा येथील इंडियन मिलिटरी स्कूल यांचा समावेश आहे.तसेच देवळी येथील ज्ञानभारती विज्ञान महाविद्यालयाचा 97.95% मारिया कनिष्ठ महाविद्यालयाचा 96.66% हरदयाल पुलगाव या कनिष्ठ महाविद्यालयाचा 91.37% ललिताबाई मुरारका यांचा 88.80% संत मोहन कनिष्ठ महाविद्याल नाचणगाव यांचा 97.91% सृजन कनिष्ठ महाविद्यालय देवळीचा 99.19 टक्के याप्रमाणे विज्ञान शाखेचा निकाल लागला आहे तर कला शाखेमध्ये यशवंत आर्ट कनिष्ठ महाविद्यालय विजय गोपाल 98.24% यशवंत आर्ट बिडी ८५.७१ टक्के जीविका आर्ट महाविद्यालय देवळी 85.71% सयाजी मोहन सरूळ 64.51% ज्ञानभारती कनिष्ठ महाविद्यालय नाचनगाव कॉमर्स शाखेचा 71.42% मारिया आर्ट देवळी शाखेचा 41.42% जनता ज्युनिअर कॉलेज देवळीचा 90.80% सविता राणी जावंदिया कनिष्ठ महाविद्यालय देवळीचा 73.7% नगरपरिषद कनिष्ठ महाविद्यालय देवळीचा 82.30% असा उत्कृष्ट निकाल लागला आहे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेश झाडे नगरपरिषद महाविद्यालयाचे प्राचार्य कपूर ताई मारिया कॉलेजचे प्राचार्य सुरशे सर ज्ञानभारतीचे प्राध्यापक सावळकर सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले आहेत.देवळी जनता जुनियर कॉलेज विज्ञान शाखेमधून 153 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 153 पास होऊन पाच विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले तर प्रथम श्रेणीत 71 विद्यार्थी पास झालेत तर कला शाखेत 88 विद्यार्थ्यांपैकी 79 उत्तीर्ण झाले कल्याणी ज्ञानेश्वर कोसळकर 600 पैकी 486 गुण प्राप्त करत 81 टक्के मार्क मिळविले तर कला शाखेतून कुमारी डिंपल शरद शिवरकर तिने 600 पैकी 470 गुण मिळविले. ज्ञान भारती जुनिअर कॉलेजची आर्या सचिन राऊत ही 86. 67% मोनि अमित राठी ८२.१७ तर आबा सोमनाथ 80.17 तर मारिया आर्ट्स ज्युनिअर कॉलेजच्या कृतिका खोडनकर 83 टक्के प्रवीण विश्वास ८२.६७% पलक शस्त्रबुद्धे 81.83% श्रावणी डांगरी अंशी पॉईंट 70 टक्के असे गुण घेत विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले या सुरेश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांनी व शिक्षकांनी अभिनंदन केले.

सागर झोरे साहसिक न्यूज -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!