देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी केला गोंधळ..
आधारभूत दराने कापूस खरेदी करण्याची मागणी.
दुपारपर्यंत होती कापसाची खरेदी बंद.
सभापती मनोज वसू यांच्या मध्यस्थीने खरेदीला सुरुवात.
देवळी : शेतकऱ्याच्या कापसाला शासनाने कापसाचे आधारभूत दर जाहीर केले यामध्ये लॉंग स्टेपल ७ हजार २० रुपये मध्यम स्टेपल ६ हजार ६३० रुपये भाव ठरविण्यात आला आहे.या दरानुसार कापूस खरेदी करावी अशी देवळी येथील मार्केट याडमध्ये विक्रीला आणलेल्या कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी होती. ही मागणी रेटून धरल्याने व्यापारी आधारभूत दरानुसार खरेदी करणे शक्य नसल्याने सांगितल्याने कापूस खरेदी बंद झाली त्यामुळे मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.शेतकऱ्यांनी युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना व इतरांना बोलावून प्रश्न निकाली काढण्या करिता सांगितले तेव्हा प्रभारी सचिव दीपक नांदे,यांनी सभापती मनोज वसू यांना सविस्तर माहिती दिली.सभापती मनोज वसु यांनी हा प्रश्न निकाली काढण्याकरिता जिल्हा निबंधक सुनील सिंगतकर, सहाय्यक निबंधक मनीषा मस्के,सी सी आय ग्रेडर चंद्रकांत हिवसे,यांना बोलावून व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी तसेच युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष सोबत बैठक घेऊन खरेदी सुरू करण्याबाबत सोबतच विविध प्रश्न एकोप्याने सोडवण्यावर संमती झाली व्यापारी विनोद घिया,जगदीश जोतवाणी,अमित सुराणा,त्रिलोक टावरी,माणक सुराणा,यांनी व्यापाऱ्याच्या अडचणी मांडल्या खरेदी व आवक जास्त असल्याने चेक देण्यामध्ये वेळ होतो त्यामुळे खरेदी आठवड्यातून दोन दिवस सुरू ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला यावर व्यापारी शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समिती बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीश ओझा,रवी चौधरी,मनीष खडसे,यांची सुद्धा उपस्थिती होती.बाजारात कापूस गाड्यांची मोठ्या प्रमाणात साधारणता दहा हजार क्विंटल ची आवक असल्याने शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तसेच दुपारी दोन वाजेनंतर खरेदी सुरू करण्यात आली.
सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी