देहदानी रामभाऊ इंगोले स्मृतिदिनाप्रित्यर्थ अ.भा.अंनिस व्दारे सखोल अभ्यास शिबिराचे आयोजन

0

देहदानी रामभाऊ इंगोले स्मृतिदिनाप्रित्यर्थ अ.भा.अंनिस व्दारे सखोल अभ्यास शिबिराचे आयोजन
BY साहसिक न्यूज 24
देवळी / सागर झोरे :
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानव समाज विकसन संस्था आणि इंगोले परिवार देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 व 22 ला स्थानिक सृजन ज्युनिअर सायन्स कॉलेज येथे देहदानी रामभाऊजी उपाख्य नानाजी इंगोले यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्य अंधश्रद्धा निर्मूलन सखोल अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन दिनांक 21 मे रोज शनिवार ला सकाळी 9.30 वाजता अ.भा.अंनिस चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पब्लिक व्हॅल्यू कल्चरल अँड एज्यूकेशनल सोसायटीचे अध्यक्ष प्रा. पंकज चोरे उपस्थित राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.अंनिस चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे, युवा शाखा राज्य संघटक पंकज वंजारे, जिल्हा उपाध्यक्ष दादाराव मुन, माजी जिल्हा अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे, जिल्हा महिला संघटिका प्रा.डॉ. सुचिता ठाकरे, जिल्हा सचिव नीलेश गुल्हाने, तालुका अध्यक्ष नरेश ढोकणे, मानव समाज विकसन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
सकाळी 9.30 ते सायं. 6 पर्यन्त चालणार्‍या या दोन दिवशीय अभ्यास शिबिरात प्रथम दिवशी अँड.गणेश हलकारे ‘मानवाची उत्पत्ती आणि अंधश्रद्धांची निर्मिती’, ‘मानवी मेंदूची गुलामगिरी’ या विषयावर तर संजय इंगळे तिगावकर ‘अ.भा. अंनिस ची भूमिका’ या विषयांवर मांडणी करणार आहे.
दुसर्‍या दिवशी ‘संत आणि चमत्कार’ या विषयावर संजय इंगळे तिगावकर ‘आत्मा भूत, चकवा, मनाचे खेळ’ या विषयावर जिल्हा महिला संघटिका प्रा.डॉ.सुचिता ठाकरे खगोल शास्त्राचे अभ्यासक प्रा.किशोर वानखेडे ‘फलज्योतीष्य एक थोतांड ‘ या विषयावर स्लाईड शो प्रात्यक्षिकाव्दारे विषय मांडणार आहे. ‘जादूटोणा विरोधी कायदा’ या विषयावर जिल्हा सचिव नीलेश गुल्हाने विषयाची मांडणी करणार आहे.
या शिबिरात देहदान करण्यात आलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते देहदान संकल्पपूर्ती तर सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्यदीप समाजभूषण गौरव सन्मान तर संस्थेमार्फत देहदानाचा संकल्प करणाऱ्यांचा संकल्प प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. देहदान करण्यात आलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांनी यासंदर्भात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी सहसचिव अजय इंगोले, प्रा. रविंद्र इंगोले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
————————————————————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!