देह विक्रीचा ऑन द स्पॉट पंचनामा-भाग 1: वर्ध्यातील गिरीपेठ भागात देहविक्रीचा बाजार पुन्हा गरम
क्राईम प्रतिनिधी/वर्धा
शहरातील सामाजिक स्वास्थ्याला कलंक असलेला देहविक्रीचा व्यापार गेल्या काही दिवसापासून पुन्हा फोफावला आहे. काही वर्षापूर्वी वर्धा पोलिसांनी पिटा कारवाई करीत देहविक्रीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता पुन्हा वर्ध्यात दलालाने देवळी रोडवरील सावंगी तसेच आर्वी नाका भागातील गिरीपेठ येथे ठाकरे नामक महिलेने कुंटनखाना सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे..
नागपूर, यवतमाळ तसेच वर्ध्यातील गरीब परिवारातील मुलीनां आणून देहव्यापार करण्यास भाग पाडले जाते… बऱ्याचदा ग्रामीण भागातील मुलींनाही नादी लावण्याचे काम करण्यात येते. सेवाग्राम येथील अजय याने सेवाग्राम मार्गांवर कुंटणखाना थाटला आहे. एवढेच नाहीतर आता महिलाही या कामात मागे नसून गिरीपेठ येथे ठाकरे नामक महिलेने तर दोन मजली घरीच कुंटनखाना सुरू केला आहे..
*दलालाची चलती*
सध्या देहविक्रीच्या व्यापारात दलालाची मोठी चालती आहे.. पोलिसांना त्यांच्या एकूण अवैध कारभाराबाबत परिपूर्ण माहिती आहे… त्यानंतरही विशेष मोहीम हाती घेऊन कठोर कारवाई केली जात नाही… क्रिकेट सट्ट्यातील काहींनीसुद्धा या दलालामार्फत गुंतवणूक सुरू केली आहे.. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडवीणारी नवी विषवली शहरात फोफावत आहे..
क्रमश: