हिंगनघाट -/ उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांना थंड पाण्यासाठी स्थानकावर पैसे देऊन पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. एकीकडे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा सहण करीत प्रवास करावा लागतो.उकाड्यामुळे शरीराला पाण्याची गरज भासते.हीच बाब लक्षात घेऊन नारायण सेवा मित्र परिवाराच्या मदतीने हिंगणघाट रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निःशुल्क थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिक, गाडीच्या खाली उतरून स्टॉलवर जाऊन पाणी घेऊ शकत नाही. अशावेळी गाडी सुटण्याची भीती असते.पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी गेल्यावर तेथे गर्दी असल्यास धावपळ होते. अशावेळी मित्रपरिवाराच्यावतीने प्रवाशांना थेट गाडीच्या डब्यात थंड पाण्याच्या बॉटल देऊन सेवा पुरवीत आहे. प्रवाशांना पिण्याचे शुद्ध थंड पाणी मोफत उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी समाधान मानले आहे.हिंगनघाट स्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू करणे हे प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याच्या आणि एकूण प्रवासाचा अनुभव उंचावण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.यावेळी नागपूर विभागाचे डीआरएम मनीष अग्रवाल हे हिंगणघाट रेल्वे स्टेशन चे निरक्षण करण्यासाठी आले असताणा नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल व मित्र परिवाराचे सदस्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना एक बर्ड फीडर भेट देण्यात आले. त्यांच्या सोबत रेल्वे स्थानकावरील वरील सुविधा बाबत चर्चा करण्यात आली.या उपक्रमात सेवा देण्यासाठी रमेश राईकवार, डॉ.शरदजी मदलवार, लक्ष्मीकांत मेढे, यशवंत गडवाल, विपिन खिंवसरा, सुनील अलोनी, चंद्रकांत रोहणकर, शंकर वाकडे, राजेश कोचर, महेश अग्रवाल, विक्की ठाकुर, जय ठाकुर, लक्ष्मण दहाके, सुभाष ललवानी, नथमल सिंघवी, अशोक सिंघवी, मनोज सिंघवी, विजय मुथा, एड. विशाल जैन, गजु देवगिरकर, कंचन खिंवसरा, कंचन ठाकुर व नारायण सेवा मित्र परिवाराचे सदस्य तसेच पदाधिकारी सहभागी होते.