निम्न वर्धा प्रकल्पातील पीडितांनी जलसमाधीचा ईशारा देताच जिल्हा प्रशासन हादरले
प्रतिनिधी / आर्वी :
गेल्या 10 वर्ष पासून निम्न वर्धा प्रकल्पांमधून सोडलेल्या अतीरीक्त पाण्यामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसान व त्याची नुकसान भरपाई मिळत नसल्याने कित्येकदा शेतकऱ्यांनी आंदोलने केली. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यांना अजूनही मदत मिळाली नाही.
निम्न वर्धा प्रकल्पाच्या सोडलेल्या पाण्याने होणाऱ्या नुकसान व या नेहमीच्या त्रासाला कंटाळून येत्या १५ नोव्हेंबर २०२१ ला प्रहार चे राजेश सावरकर सरपंच रसुलाबाद आणि मौजा सोरटा, वढाळा, पिंपळगाव, सालफळ, मारडा, रोहणा, दिघी, सायखेडा व तालुक्यातील इतर गावातील नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या सह जलसमाधी घेण्याबाबत चे निवेदन दिले होते. यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ दि.९ नोव्हेंबर २०२१ रोजीला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली. त्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता लोअर वर्धा प्रकल्प आणि त्यांचा अधिकारी वर्ग व शेतकरी आंदोलनकर्ते यामध्ये सविस्तर चर्चा झाली.
परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने येत्या १५ नोव्हेंबर २०२१ ला नियोजित असलेले जल समाधी आंदोलन हे शेतकरी करणारच हे मात्र आता नक्की झाले आहे.
या बैठकीला प्रहार चे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, राजेश सावरकर सरपंच रसुलाबाद, सोरटा येथील सरपंच महेंद्र मानकर, उपसरपंच मंगेश मानकर तसेच शेतकरी प्रमोद भाऊ केने, प्रशांत भाऊ देशमुख, राजुभाऊ सोनकुसरे रोहणा, सुशिलभाऊ बोबडे सायखेडा, सुधाकरराव किलोर पुलगाव, शंकरराव सयाम, विनायक राव डफडे, भिमराव कुत्तरमारे सोरटा येथील शेतकरी उपस्थित होते.