निष्काळजी तसेच हलगर्जीपने वाहन चालवून सदोष मनुष्य वधाच्या गुन्हाकरणाऱ्या आरोपींताना दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.
पुलगाव/अमित ददगाल
वर्धा येथील मा. जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धा (श्रीमती एम.आय. आरलैंड) यांनी आरोपी नामे निलेश मोरेश्वर तामगाडगे रा. रमाई नगर, गुंजखेडा, पुलगाव ता. देवळी, जि. वर्धा, मो. सलिम अब्दुल गफार रा. पाकीजा कॉलनी, अमरावती, ता.जि. अमरावती, चंद्रसेन चिंधुजी डोंगरे, लता एकनाथ टेम्भर्णे उर्फ लता चंद्रसेन डोंगरे, आरोपी क्र. 3 व 4 रा. आर.के. कॉलनी, रमाई निवास, नाचणगाव, पुलगाव ता. देवळी, जि. वर्धा, यांना कलम 304 (2), 34 भा.द.वी. नुसार 10 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु. 50 हजार दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आले. आरोपी निलेश मोरेश्वर तामगाडगे यास खालील कलमानुसार शिक्षा ठोठावण्यात आली.
कलम 337 भां.द.वी नुसार 6 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये 500 व दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आले.
कलम 338 भां.द.वी नुसार 2 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये 1000 व दंड न भरल्यास अतिरिक्त 2 महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आले.
कलम 184 मोटार वाहन कायद्यानुसार 6 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा व रुपये 1000 व दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवसाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आले.
कलम 185 मोटार वाहन कायद्यानुसार 6 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा व रुपये 2000 व दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवसाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आले. तसेच सर्व आरोपींना मृतक नामे आशय अशोक रामटेके व सम्राट प्रफुल काळे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रुपये 50 हजार व जखमींना नामे रीता धवळे व नायझा पठाण यांना प्रत्येकी रुपये 25 हजार तसेच उर्वरित रक्कम रुपये 54 हजार पाचशे शासनास जमा करण्याचा आदेश पारित करण्यात आला. घटनेची थोडक्यात हकीगत अशी की दि. 23/04/2014 रोजी सकाळी 8 ते 8.30 वाजताच्या दरम्यान आरोपी निलेश मोरेश्वर तामगाडगे हा दारूच्या नशेत शाळेतील मुलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल या शाळेत मारुती व्हॅनद्वारे घेऊन जात असताना भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून जवाहर कॉलनी समोर हायवे रोड पुलगाव येथे रस्त्याच्या मध्ये उभा असलेल्या ट्रकला मागून धडक मारली त्यामुळे मारुती व्हॅन मधील विद्यार्थी नामे आशय अशोक रामटेके, सम्राट प्रफुल काळे यांचा जागीच मृत्यू झाला व दोन शिक्षिका तसेच इतर विद्यार्थी गंभीर रित्या जखमी झाले अशा पोलीस स्टेशन पुलगाव येथे फिर्यादीने तोंडी रिपोर्ट दिला व त्यावरून पोलीस स्टेशन पुलगाव यांनी सदर गुन्ह्यात आरोपी नीलेश तामगाडगे याच्यावर कलम 279, 304(अ), 337, 338 भां.द.वी सह कलम 184, 185 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आरोपी सलीम अब्दुल गफार याने आपला ट्रक हायवे रोडवर उभा करून अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते याची माहिती असतानासुद्धा त्याच्या ताब्यातील ट्रक विनाकारण जाणीवपूर्वक हायवे रोड च्या मधोमध उभा केला. त्यामुळे अपघात घडवून आणण्यास इतर आरोपी सह संगनमत केले त्यामुळे त्यावर कलम 304, 336, 338 भां.द.वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी चंद्रसेन डोंगरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल पुलगाव चे व्यवस्थापक असून शाळेतील मुलांची महाराष्ट्र शासनाच्या स्कूल बस नियम 2011 अन्वये मुलांची सुरक्षितपणे वाहतूक करण्याची जाणीव असताना सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करून खासगी वाहनाचा बेकायदेशीरपणे वापर करून चालका जवळ परवाना नसताना देखील गाडी देऊन दुर्लक्ष केले त्यामुळे व्हॅन चालक हा दोन मुलांच्या मृत्यूस व इतर लोकांच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्यामुळे त्यावर कलम 304 भां.द.वी व सहकलम 74 महा. मोटर वाहन नियम प्रमाणे गुन्हा नोंद केला आरोपी लता चंद्रसेन डोंगरे हिने आपली स्वतःची मारुती व्हॅन अप्रशिक्षित वाहनचालक निलेश तामगाडगे याला चालविण्यास दिल्याने तिचे हे कृत्य कलम 5(1)(180) मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशन पुलगाव येथील पोलिस निरीक्षक राजेंद्र तायडे यांनी केला व आरोपीतानी गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अपघात क्रमांक 94/2014 नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले. सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. गिरीश व्ही. तकवाले यांनी कामकाज पाहिले व यशस्वी युक्तिवाद केला त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हवालदार, अनंत रिंगने ब.क्र. 175 पोलीस स्टेशन पुलगाव यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली शासनातर्फे एकूण 7 साथीदार तपासले मा. जिल्हा न्यायाधीश-1 अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धा (श्रीमती एम आय आरलँड) यांनी आरोपीस दिनांक 18/11/2019 रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.