नुकसानग्रस्तांना तात्काळ त्याआर्थिक मदत देण्यात यावी,प्रहार संघटनाची मागणी…..

0

देवळी -/ अचानक अवकाळी पावसामुळे बुधवार दि.२२ मे रोजी गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले, त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ज्यामध्ये जास्त प्रमाणात माती, गोट्यांच्या घरांचा समावेश आहे, कारणास्तव संबंधित सर्व घर कुटुंबांची भेट घेऊन योग्या त्या अधिकारी वर्गाच्या माध्यमातून पंचानामे करुन लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी कारण पुढील महिन्यापासुन पावसाळा सुरू होणार आहे,त्याकरिता त्यांना राहण्या ची व्यवस्था लवकर होईल.या नुकसानत्मक परिस्थितीच्या चर्चेमध्ये घरकुल संबंधीत योजनेवर लोकांचा रोष दिसून आला.घरकुर न मिळाल्याने अनेक लोकांचे घर हे अजुन पण गोट्या,मातीचे आहे.पावसाळा सुरू होणार म्हणून गोट्या मातीने व प्लास्टिक कागद, टिनपत्रे टाकुन आपली घरे राहण्या योग्य केली, पण अचानक वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक लोकांच्या घराचे छप्पर उडाले,तर काही लोकांचे घरेच जमीन दोस्त झाली,या मध्ये महत्वाची बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.पण सरकार जीवीत हानी होण्याचीच वाट बघते की काय,असे गावकऱ्यांच्या संवादातुन निर्दशनास आले.गेल्या काही वर्षा पासुन कित्येक गरजु लोकांनी घरकुल योजना मिळावी या करिता सरकार ने काढलेल्या नवनवीन घरकुल योजने साठी अर्ज केले.पण मात्र गरजु लोकांना कमी प्रमाणात या योजनांचा लाभ मिळत आहे.ज्या कुटुंबीयांना घरकुल ची आवश्यकता नाही अशांना मात्र या योजनेचा जास्त लाभ मिळाला असे निर्दशनास येत आहे.या करिता गावातील सर्व शासकीय अधिकारी वर्गांनी याकडे विशेष लक्ष देवुन शासन दरबारी राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचा लाभ अत्यंत गरजु कुटुंबांना कसा मिळवुन देता येईल, या करिता योग्य ती अंमलबजावणी करावी.व आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाना पक्के घर कसे मिळवुन देता येईल, यावर भर देण्यात यावा.ज्यामुळे प्रत्येक गरजवतांना या योजनेचा लाभ होईल,त्यामुळे प्रत्येकांमध्ये गावा बदल व गावातील अधिकारी व लोकांबद्दल आपुलकीची भावना निर्माण होईल.तसेच आता झालेल्या नुकसानग्रस्तांना पण कोण कोणत्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवुन देता येईल, या करिता सुद्धा विशेष लक्ष देण्यात यावे.असे प्रहार संघटनेचे प्रफुल वरठी यांनी आपले मत व्यक्त केले.

सागर झोरे साहसिक न्यूज -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!