परमीट चा माल घेण्यासाठी देवळीतील “उमरे कृषि सेवा केंद्राने” बोगस औषधी जबरदस्तीने मारली शेतकर्‍याच्या माथ्यावर: उमरे कृषि केंद्र व कृषि अधिकारी यांच्या मिलिभगत मुळे शेतकर्‍याच्या तक्रारीला दाखविली केराची टोपली

0

तालुका प्रतीनिधी/ देवळी:

तालुक्यात तसेच जिल्ह्यात वेगवेगळा ठिकाणी कृषि केंद्र धारकांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होणं हे नियमितचं आहे. तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक शेतकर्‍यांची फसवणुक करुन शेतकर्‍यांना माल देतात तर दुसरीकडे सबसिडी लाटण्यासाठी अनुदानपात्र खताचे बिलं ऑनलाईन टाकुन सरकारचीही फसवणुक करीत असल्याचे प्रकार नेहमीचं उघडकीस येत असतात. तसेच, एखाद्या शेतकर्‍याने अश्या प्रकारचा गैर-व्यवहार उघडकीस आनण्याचा प्रयत्न केला तर त्यांस लगेचचं मूर्खात काढण्याची प्रथा सुद्धा आपल्याला पहायला मिळते.

असाच प्रकार देवळी येथील उमरे कृषि सेवा केंद्र चालकाच्या बाबतीत उघडकीस आला आहे. अनमोल बाबाराव गणविर रा. देवळी या पीडित शेतकर्‍याला उमरे कृषि केंद्र चालकाने परमीट वर चणा देण्यास स्पष्ट नकार दिल्याबाबत अनमोल गणविर यांनी दिनांक: ०१.११.२०२१ रोजी संबंधित कृषि अधिकारी यांच्याकडे लिखित तक्रार सादर करीत उमरे कृषि केंद्र चालक यांच्यावर कार्यवाही व त्यांचा परवाना रद्द करून कृषि सेवा केंद्र बंद करण्याची विनंती कृषि अधिकारी यांच्या मार्फत शासनास केली होती, परंतु सदरच्या प्रकरणी अजून पर्यन्त कार्यवाहीत शासकीय खात्यामार्फत दिरंगाई.

सदरचे वृत्त असे की, यातील अनमोल बाबाराव गणविर हा उमरे कृषि केंद्रा मध्ये परमीट वर चणा घेण्या करिता गेला असता त्यांस उमरे कृषि केंद्र चालक याने चण्याच्या बॅग सोबत रायझोबिएम व पीएसबी कल्चर याची बॉटल घेण्याची सक्ती केली. परंतु अनमोल बाबाराव यांनी सदरची अतिरिक्त बॉटल घेण्यास नकार दिला असता त्यावर लगेचचं कृषि केंद्र चालकाने अनमोल बाबाराव गणविर या ग्राहकास परमीटच्या बॅग देण्यास स्पष्ट नकार दिला व परमीट परत दिले. सोबतचं जर रायझोबिएम व पीएसबी कल्चर याची बॉटल घेशील तरचं परमीट चा चणा मिळेल असे सांगून परत केले.

याप्रकरणी कृषि केंद्र चालक यांचेकडून शेतकर्‍याची फसवणूक झाली असून त्यातही महत्वाचे म्हणजे अश्या पद्धतीच्या कृषि केंद्र चालकाच्या गैर-व्यवहारामुळे अनमोल बाबाराव गणविर तसेच संपूर्ण शेतकर्‍यांचा आत्मसम्मान दुखावला गेल्यामुळे उमरे कृषि केंद्र चालक यांचेवर कायदेशीर कार्यवाहीची अपेक्षा करीत व कृषि केंद्र चालकाचा असा असामाजिक स्वभाव संपुष्टात यावा जेणेकरून भविष्यात असा गैर-प्रकार कोणत्याही कृषिकेंद्र चालकांकडून शेतकर्‍यां सोबत होणार नाही. या अपेक्षेने कृषि अधिकारी यांनी सखोल चौकशी करून संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. परंतु एक महिना लोटूनही कृषि अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेली कार्यवाही अजूनही अंधारातचं.

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!