पवनारात अल्पवयीन मुलीची गळा आवरुन खुन…! मृतदेह खड्ड्यात पुरवला

0

पवनार / सतिश अवचट:

गेल्या पाच दिवसापासुन बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय मुलीचा गळा आवरुन खुन केल्याची धक्कादायक घटना पवनार येथे बुधवार (ता.२०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रिताका काखे वय १४ वर्षे असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
पवनार येथे राहनारी अल्पवयीन मुलगी ही शनिवार पासुन पेबत्ता असल्याची तक्रार सोमवारी सेवाग्राम पोलिसात तिच्या आईने दिली होती. तक्रारीची दखल घेत सेवाग्राम पोलिसांनी आपला तपास चालू करीत मुलीचा शोध घेतला. यात आरोपी सतीश जोगे वय ३० वर्षे रा. पवनार याला ताब्यात घेतले त्याला पोलिसी हिस्का दाखविल्यानंतर तब्बल पाच तासांनी त्याने रितीकाचा खुन केल्याची कबुली दिली.
आरोपी सतीशने रितीकाचा सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दुपट्ट्याने गळा आवरुन खुन केला आणि मृतदेह नदीलगतच्या बेसरमच्या झाडाजवळ गड्डा करुन पुरविला होता. आरोपीने घटनास्थळाची माहिती सेवाग्राम पोलिसांनी दिली पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. मृतदेह पुर्णपने नग्णावस्थेत आणि कुजलेल्या अवस्थेत होता. यावेळी घटनास्थळी पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंकी, उप विभागीय पोलिस अधिकारी पियूश जगताप, सेवाग्रामचे ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!